नवा सीईओ गोदरेजला बनवणार का एचयूएल?

Will the new CEO Revive GCPL

गुड नाईट, हिट एअर अशा ब्रॅंड्सची नावे घेतली तर कदाचित अनेकांना हे ब्रँड्स कोणत्या कंपनीचे आहेत हे लक्षात येणार नाही. आपण रोज म्हटलं तरी हे ब्रँड घरात वापरत असतो. वापरत नसलो तरी त्यांची नावं आपल्या कानावर पडत असतात, आपल्या बोलण्यात येत असतात. ही सगळी आणि आणखी बरीच उत्पादने बनवणारी कंपनी म्हणजे गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स. आपण घरात वापरत असलेली कीटकनाशके, साबण, सॅनिटायझर बनवणारी ही भारतातील एक आघाडीची कंपनी आहे.

कंपनी भारतासोबत जगभरातील इतर अनेक देशांमध्ये आपली उत्पादने विकत असते. विविध देशांतील कंपनीच्या मार्केट पोझिशनवर एक नजर टाकुयात.

भारत –
घरात वापरल्या जाणाऱ्या कीटकनाशकांचा (हाऊसहोल्ड इन्सेक्टीसाईड्स) प्रथम क्रमांकाचा ब्रँड
एअर फ्रेशनर्सचा प्रथम क्रमांकाचा ब्रँड
हेअर कलरचा प्रथम क्रमांकाचा ब्रँड
साबणाचा प्रथम क्रमांकाचा ब्रँड

इंडोनेशिया –
घरात वापरल्या जाणाऱ्या कीटकनाशकांचा प्रथम क्रमांकाचा ब्रँड
एअर फ्रेशनर्सचा प्रथम क्रमांकाचा ब्रँड
वेट वाईप्सचा प्रथम क्रमांकाचा ब्रँड

आफ्रिका आणि अमेरिका –
एथनिक हेअरचा प्रथम क्रमांकाचा ब्रँड (सब सहारन आफ्रिका)
हेअर एक्सटेंशन चा प्रथम क्रमांकाचा ब्रँड (सब सहारन आफ्रिका)
हेअर रिलॅक्सरचा प्रथम क्रमांकाचा ब्रँड (सब सहारन आफ्रिका)
वेट हेअर केअर चा प्रथम क्रमांकाचा ब्रँड (अमेरिका)
हेअर कलरचा प्रथम क्रमांकाचा ब्रँड (दक्षिण आफ्रिका)

लॅटिन अमेरिका –
हेअर कलरचा प्रथम क्रमांकाचा ब्रँड (अर्जेंटिना)
हेअर फिक्सिंग स्प्रेचा प्रथम क्रमांकाचा ब्रँड (अर्जेंटिना)
हेअर स्टायलिंग प्रॉडक्ट्सचा प्रथम क्रमांकाचा ब्रँड (अर्जेंटिना)

कंपनीने गेल्या सलग तीन क्वार्टरमध्ये सेल्समध्ये दोन आकडी वाढ नोंदवली आहे. २०२०-२१ मध्ये कंपनीने सेल्समध्ये एकूण ११% वाढ नोंदवली. ३१ मार्च २०२१ रोजी संपलेल्या क्वार्टर मध्ये कंपनीने भारतातील सेल्समध्ये ३५%, आफ्रिका, यूएसएस आणि मिडल इस्टमध्ये ३६%, लॅटिन अमेरिका आणि सार्क रिजनमध्ये ५४% तर इंडोनेशियामध्ये ४% वाढ नोंदवली. कंपनीचा सेल्स मार्च २०२० मधील २२०२ कोटींवरून मार्च २०२१ मध्ये २७४७ कोटींवर जाऊन पोहोचला. कंपनीचा नफा मार्च २०२० मधील २२९ कोटींवरून मार्च २०२१ मध्ये ३६५ कोटींवर जाऊन पोहोचला आहे.

करोनामुळे लोक स्वच्छतेबद्दल बरेच जागरूक झाले आहेत. याचाच फायदा कंपनीच्या हाऊसहोल्ड इन्सेक्टीसाईड्स डिव्हिजनला झाला आहे. या डिव्हिजनने भारतातील सेल्समध्ये ३४% वाढ नोंदवली तर ग्लोबल सेल्समध्ये २८% वाढ नोंदवली. कंपनीच्या हायजिन प्रॉडक्ट्स डिव्हीजनने सेल्समध्ये ३८% वाढ नोंदवली तर व्हॅल्यू फॉर मनी डिव्हिजनने ज्यात गोदरेज एक्स्पर्ट रिच क्रीम सारख्या प्रॉडक्ट्सचा समावेश होतो, २७% वाढ नोंदवली.

सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे कंपनी डेट फ्री आहे. कंपनीने नुकतेच सुधीर सीतापती यांना मॅनेजिंग डायरेक्टर अँड सीईओ पदावर नियुक्त केले आहे. गोदरेजमध्ये येण्याआधी जवळपास २२ वर्षे सीतापती हे हिंदुस्थान युनिलिव्हरमध्ये कार्यरत होते. कंपनीच्या फूड्स अँड रिफ्रेशमेंट बिझनेसच्या एक्झेक्युटिव्ह डायरेक्टर पदावरून नुकतेच ते पायउतार झाले होते. सीतापती यांच्या नियुक्तीमुळे कंपनीच्या हाऊसहोल्ड इन्सेक्टीसाईड्स आणि हेअर कलर बिझनेसला चालना मिळेल असे कंपनी व्यवस्थापनाला वाटते. येणाऱ्या काळात जागतिक बाजारपेठेत आपले प्रॉडक्ट्स नेण्यासाठी सीतापती यांचा अनुभव उपयोगी पडू शकतो. सीतापती यांच्या फक्त नियुक्तीच्या बातमीने कंपनीच्या शेअरमध्ये १२ मे रोजी २४% हून अधिक वाढ दिसून आली होती. बुधवारी शेअर ८७० रुपयांवर बंद झाला. सीतापती यांच्या नियुक्तीच्या बातमीनंतर जेफरीज, सीएस, मोतीलाल ओसवाल यांसारख्या आघाडीच्या वित्त संस्थांनी या शेअरसाठी बाय रेटिंग दिले आहे. सध्या या शेअरवर फक्त नजर ठेवायला हरकत नाही.

Comments are closed.