“हे” डिस्काउंट ब्रोकर लवकरच बनणार AMC
Zerodha gets approval to launch AMC Mutual Fund
देशातील सर्वात मोठे डिस्काउंट ब्रोकर लवकरच AMC बनण्याची चिन्हे सध्या दिसत आहेत. १सप्टेंबर रोजी झिरोधाचे संस्थापक नितीन कामथ यांनी जाहीर केले की त्यांच्या फर्मला AMC स्थापन करण्यासाठी सेबी कडून तत्त्वतः मान्यता मिळाली आहे.
फेब्रुवारी २०२१ मध्ये कंपनीने म्युच्युअल फंड परवान्यासाठी अर्ज केला होता.यासह,झिरोधा आता एका वर्षाच्या कालावधीत आपली ॲसेट मॅनेजमेंट कंपनी (एएमसी) सुरू करण्यास सक्षम असेल.
याआधी ऑगस्टमध्ये बजाज फिनसर्वला ३५ ट्रिलियन रुपयांच्या म्युच्युअल फंड उद्योगासाठी सेबीकडून मान्यता मिळाली होती.
झिरोधाने आपल्या डिस्काउंट ब्रोकरेज व्यवसायात ट्रान्झेक्शन खर्च कमी करण्यावर दीर्घकाळापासून लक्ष केंद्रित केले आहे. फर्मने कमी किमतीचे फंड सुरू करण्याची योजना देखिल आखली होती.
कामथ म्हणाले,तरुण गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी म्युच्युअल फंड उत्पादने सुलभ करणे आवश्यक आहे.
झिरोधाने २०१० मध्ये ‘२० रुपये प्रति ऑर्डर ब्रोकर ‘ म्हणून आपला प्रवास सुरू केला होता आणि आता कमी किमतीचा प्लेअर म्हणून लोकप्रियता मिळवली.
झीरोधा एक्सचेंजवर दिवसाला चार मिलियन व्यवहार करते. किरकोळ गुंतवणूकदारांना झिरोधा ने सुरू केलेल्या ‘कॉइन’ प्लॅटफॉर्मचा वापर करून म्युच्युअल फंड योजनांच्या थेट पर्यायामध्ये गुंतवणूक करणे आकर्षक वाटते. कॉईनकडे आज ५५०० कोटींची ॲसेट आहे.
So, we just got our in-principle approval for our AMC (MF) license. I guess now comes the hard part. https://t.co/g35YH60ksC
— Nithin Kamath (@Nithin0dha) September 1, 2021
Comments are closed.