झोमॅटो ग्रोफर्समध्ये करणार तब्बल 500 मिलियन डॉलरची गुंतवणूक, ‘हे’ आहे कारण
फूड डिलिव्हरी फर्म झोमॅटो ग्रॉफर्समध्ये तब्बल 500 मिलियन डॉलर गुंतवणूक करण्याची तयारी करत आहे. यासाठी फर्मने तयारी सुरु केली आहे.
फूड डिलिव्हरी फर्म झोमॅटो ग्रॉफर्समध्ये तब्बल 500 मिलियन डॉलर गुंतवणूक करण्याची तयारी करत आहे. यासाठी फर्मने तयारी सुरु केली आहे.
या वर्षाच्या सुरुवातीलाच झोमॅटोने ग्रोफर्समध्ये 100 मिलियन डॉलर इतकी गुंतवणूक केली होती.
सूत्रांनी सांगीतले की, “दोन्ही कंपन्यांमध्ये चर्चा सुरू आहे आणि झोमॅटो स्वतःहून 500 मिलियन डॉलर गुंतवणूक करेल अशी अपेक्षा आहे.
सदर गुंतवणुकीचे मुख्य कारण हे व्यवसाय वाढ हेच आहे,जेणेकरुन झोमॅटो ग्रोफर्सद्वारे आपला व्यवसाय वाढविण्याचा प्रयत्न करेल.
जर कंपनीचे सगळे व्यवहार पूर्ण झाल्यास झोमॅटोचे ग्रोफर्समधील होल्डिंग सुमारे 30% पर्यंत वाढवले जाईल. सॉफ्टबँक व्हिजन फंड हे ग्रोफर्समध्ये सर्वात मोठे शेअरहोल्डर म्हणून जवळपास 45% शेअर्स धारण करतात तर टायगर ग्लोबल आणि सेक्वोया कॅपिटल हे झोमॅटो आणि किराणा ईटेलरमधील जनरल गुंतवणूकदार आहेत.
झोमॅटो आणि ग्रोफर्सच्या प्रतिनिधींनी मात्र याबाबत कसलीही टिप्पणी केली नाही.
Comments are closed.