गुंतवणूकदारांनो सावधा!, रघुराम राजन यांचे क्रिप्टो करन्सीबाबत मोठे वक्तव्य
Raghuram Rajan warns about future of Crypto Currency
रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी क्रिप्टो करन्सीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या जवळपास सगळ्या क्रिप्टो करन्सी कालानुरूप गायब होतील असे त्यांनी म्हटले आहे. सध्या एकूण ६००० हून क्रिप्टो करन्सी अस्तित्वात आहेत. रघुराम राजन यांच्या मते यापैकी फक्त १ किंवा २ वाचतील. इतर सर्व क्रिप्टो करन्सी कालबाह्य होतील.
सीएनबीसी टीव्ही १८ ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना राजन म्हणाले, “एखाद्या गोष्टीला भविष्यात चांगला भाव मिळेल म्हणून ती आज महाग असेल तर तो एक बबल आहे. सध्या क्रिप्टो करन्सीला भाव आहे कारण कुणीतरी मूर्ख त्या विकत घेण्यासाठी तयार आहे.”
भारत सरकार लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात याबाबत एक विधेयक आणणार आहे. या विधेयकाद्वारे सध्या अस्तित्वात असलेल्या खाजगी क्रिप्टो करन्सीवर बंदी घालण्याचा विचार सरकार करत आहे. मात्र सरकार रिझर्व्ह बँकेची स्वतःची क्रिप्टो करन्सी लाँच करणार असल्याचेही वृत्त आहे.
राजन यांच्यामते क्रिप्टो करन्सी आणि चिट फंड हे सारखेच आहेत. चिट फंडांमुळे ज्या समस्या उदभवल्या होत्या त्याच क्रिप्टो करन्सीमुळे उद्भवू शकतील. “चिट फंड्स लोकांकडून पैसे घेतात आणि त्यांचा बबल फुटतो. क्रिप्टो करन्सी होल्ड करणाऱ्या लोकांच्या बाबतीतही असेच होणार आहे.” सरकारने ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीच्या वाढीसाठी उत्तेजन दिले पाहिजे असे मतदेखील त्यांनी व्यक्त केले.
Comments are closed.