ARC साठी अदानी समूहाला मिळू शकतो हिरवा कंदील, RBI कडून आला विशेष अहवाल
रिअल इस्टेटमधील अडचणीत सापडलेल्या ॲसेटचे संपादन करण्याच्या उद्देशाने, अदानी समूहाने मालमत्ता पुनर्रचना कंपनी (ARC) उघडण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे परवाना घेण्यासाठी अर्ज केला आहे.
सध्या भारतात गुंतवणुकीचे वारे वाहत आहे.बरेचसे गुंतवणूकदार मार्केटमधील संधीचा फायदा करुन घेत आहे.अदानी समूह त्यातीलच एक! केंद्रात मोदी सरकार आल्यापासून अदानी समूहाचा गुंतवणूक आलेख उंचावतच आहे.आता हाच समूह रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याची तयारी करत आहे.
रिअल इस्टेटमधील अडचणीत सापडलेल्या ॲसेटचे संपादन करण्याच्या उद्देशाने, अदानी समूहाने मालमत्ता पुनर्रचना कंपनी (ARC) उघडण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे परवाना घेण्यासाठी अर्ज केला आहे.
रिपोर्टनुसार, सदर अर्ज आठ महिन्यांअगोदरच दाखल करण्यात आला होता, त्यावर सध्या फक्त RBI ची मंजूरी आवश्यक आहे.
अदानी समूहाची नॉन बँकिंग वित्तीय कंपनी (NBFC) अदानी कॅपिटलला RBI च्या नियमांनुसार बुडीत कर्जे खरेदी करण्याची परवानगी मिळालेली आहे. परंतु ARC फायद्याची असल्यामुळे फर्म ARC चा विचार करत आहे.
यापूर्वी देखील,अदानी समूहाने अडचणीत असलेले बंदर व्यवसाय काबीज केले होते. फेब्रुवारीमध्ये,अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन्स लिमिटेडने दिघी पोर्ट लिमिटेडला 705 कोटी रुपयांना विकत घेतले, तर 2021 मध्ये कृष्णपट्टणम आणि गंगावरम बंदरे देखील विकत घेतली होती. याशिवाय, अदानी पोर्ट्स आता भारतातील 30 टक्के बंदर वाहतूक नियंत्रित करते.
तसेच, अदानी समूहाने मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (MIAL) मध्ये कंट्रोलिंग स्टेक विकत घेतला आहे.अदानी समूहाने IBC अंतर्गत दीवान हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (DHFL) साठी देखील बोली लावली होती.
RBI समितीने 2 नोव्हेंबर रोजी एक अहवाल प्रसिद्ध केला, ज्यामध्ये ARCs ला IBC प्रक्रियेत रिझोल्यूशन अर्जदार म्हणून काम करण्याची परवानगी देण्याचा प्रस्ताव आहे. अदानी समूहाच्या ARC ला मान्यता मिळण्यासाठी ही सकारात्मक गोष्ट ठरू शकते.
Comments are closed.