एअर इंडिया आणि २५० कोटींचा रिफंड! पाहा काय आहे नेमकं प्रकरण
Air India has around Rs 250 crore of COVID-19 linked travel refunds to passengers pending.
मागिल दोन वर्षांत कोविड मुळे हवाई वाहतूकीस खूप अडचणीचा सामना करावा लागला, त्यात भारताच्या एअर इंडियाचाही समावेश आहे.
कोविड मध्ये रद्द झालेल्या उड्डाणांशी संबंधित सुमारे २५० कोटी रुपये परतावा अद्याप एअर इंडियाकडे प्रलंबित आहे, कंपनीने सांगितले की ते सदर प्रक्रिया जलद करण्याची योजना आखत आहे. जुलैच्या सुरुवातीपासून परताव्याची प्रक्रिया सुरू झाली आहे त्यात म्हटले आहे की, महामारीच्या दुस-या लाटेदरम्यान देशांतर्गत प्रवासावरील निर्बंधांमुळे आणि काही आंतरराष्ट्रीय उडडाणावर भारतात येण्या -जाण्यावर निर्बंध लादल्यामुळे कंपनीच्या उत्पन्नाला “मोठा फटका” बसला.
कंपनीने म्हटले, की “एअर इंडिया भारतात आणि परदेशात स्वयंचलित रिफंड उघडत आहे. आम्ही मागील महिन्यात सुमारे १३० कोटी रुपये रिफंड मंजूर केला आहे आणि ही प्रक्रिया जलद करण्याची योजना आखत आहोत.”
ह्या घडामोडी अशा वेळी होत आहेत जेव्हा सरकार एअर इंडियाचे खासगीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे आणि इंडिगोसारख्या इतर वाहकांनी गेल्या वर्षीपासून कोविड -19 लॉकडाऊन आणि निर्बंधांमुळे प्रभावित झालेल्या ग्राहकांसाठी रिफंड प्रक्रिया मंजूर केली आहे.
ट्रॅव्हल ऑपरेटर आणि ऑनलाईन ट्रॅव्हल प्लॅटफॉर्म ना इतर देशांतर्गत वाहकांकडून नियमित रिफंड मिळत असताना, एअर इंडियासाठी ही प्रक्रिया लांबली होती.
एअर इंडिया संबधीत व्यक्तीने सांगितले की,”असे दिसते की कॅश फ्लो व्यवस्थापित करण्यासाठी एअर इंडिया प्रवाशांना रिफंड देण्यास उशीर करत आहे. एअर इंडियाकडून रिफंडसाठी सुविधा उपलब्ध करण्याचा कालावधी अत्यंत मर्यादित आहे”.
आणखी एका ट्रॅव्हल ऑपरेटरने नाव न छापण्याचा अटीवर सांगितले, “एअर इंडियासोबत रिफंड ही एक मोठी समस्या आहे आणि सर्व ट्रॅव्हल ऑपरेटर्सना या समस्येला सामोरे जावे लागत आहे. आम्हाला गो फर्स्ट आणि स्पाइसजेटच्या विलंब समस्यांचा सामना करावा लागला नाही.”
सुमारे आठवडाभरापूर्वी, मेकमायट्रिपने आपल्या सीईओ राजेश मागो यांच्याकडून ग्राहकांना एक नोट जारी केली होती ज्यात असे म्हटले होते की त्यांनी मागील वर्षापासून ६४२ कोटी रुपयांचे रिफंड वितरीत केले आहेत आणि लॉकडाऊन कालावधीत ९९.६% बुकिंगचे निराकरण झाले.
मागो म्हणाले, “विमानसेवेच्या मोठ्या प्रमाणावर विघटनांमुळे जगभरातील अनेक विमान कंपन्यांवर परिणाम झाला आहे, रिफंडसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर २४ मे २०२० पर्यंत प्रवासासाठी बुक केलेले भाडे परत करण्याचे आदेश आम्ही पाळत असून रिफंड ग्राहकांना देऊ केला जात आहे.”
लॉकडाऊन दरम्यान उड्डाण रद्द केल्यामुळे इंडिगोने ९९.५% रिफंडची प्रक्रिया केली आहे, असे इंडिगोने या वर्षी मार्चमध्ये जाहीर केले होते.
गेल्या वर्षी, सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की, २५ मार्च ते २४ मे दरम्यान विमान तिकिटे रद्द करणाऱ्या प्रवाशांना विमान कंपन्यांना पूर्ण रिफंड द्यावा लागेल.
हे भारतीय किंवा परदेशी वाहकांवरील देशांतर्गत उड्डाणे आणि भारताबाहेरील आंतरराष्ट्रीय उड्डाणासाठी लागू होते.
Comments are closed.