२०१८ मध्ये फसला पण २०२१ ला आणलाच, येतोय ॲमी ऑरगॅनिक्सचा IPO

The IPO of speciality chemicals maker Ami Organics will open for subscription on Wednesday, September 1.

स्पेशॅलिटी केमिकल्स उत्पादक ॲमी ऑरगॅनिक्सचा आयपीओ पुढील आठवड्यात १ सप्टेंबर रोजी हेल्थकेअर चेन विजया डायग्नोस्टिकच्या आयपीओ सह येणार असून ३ सप्टेंबर रोजी बंद होईल. तर आयपीओचा प्राइस बँड ६०३-६१० रूपये प्रति शेअर असा असेल.

कंपनी फ्रेश इश्यूमध्ये २०० कोटी किमतीचे इक्विटी शेअर्स घेऊन येणार आहेत तर प्रमोटर्स आणि सध्याच्या शेअर होल्डर्सचे ६,०५९,६०० शेअर्स ऑफर फॉर सेल (OFS) मधून मार्केट येणार आहेत. आयपीओमधून मिळणाऱ्या १४० कोटींचा वापर विशिष्ट कर्जाची परतफेड करण्यासाठी आणि ९० कोटी कार्यरत भांडवलाच्या गरजांसाठी उभारला जाईल.

निरीक्षकांच्या मते, ॲमी ऑर्गेनिक्सचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये ६० रू च्या प्रीमियम (जीएमपी) वर उपलब्ध आहेत. ग्रे मार्केट हे एक अनधिकृत व्यासपीठ आहे ज्यामध्ये शेअरची लिस्टिंग होईपर्यंत आयपीओ प्राइस बँडच्या घोषणेनंतर व्यापार सुरू होतो.

आयपीओबाबत कंपनीला सल्ला देण्यासाठी ॲक्सिस कॅपिटल, ॲम्बिट प्रायव्हेट लिमिटेड आणि इंटेंसिव्ह फिस्कल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांची मर्चंट बँकर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

ॲमी ऑरगॅनिक्स विविध वापरात असलेल्या विशेष रसायनांच्या अग्रगण्य आर अँड डी संचालित उत्पादकांपैकी एक आहे, जे नियमित आणि जेनेरिक एपीआय (सक्रिय फार्मास्युटिकल घटक) आणि एनसीई (नवीन रासायनिक घटक) तसेच ॲग्रोकेमिकलसाठी फार्मा इंटरमीडिएट्सच्या विकास आणि निर्मितीकडे लक्ष केंद्रित करते.

फर्मने १७ मुख्य क्षेत्रांमध्ये API साठी ४५० पेक्षा जास्त फार्मा इंटरमीडिएट्स विकसित केले आहेत ज्यात रिसर्च अँड डेव्हलपेंट (R&D) वर लक्ष केंद्रित केले आहे जसे की अँटी रेट्रोव्हायरल, अँटी डीप्रेसंट, अँटी कॅन्सर, अँटी पार्किन्सन यांचा समावेश आहे. आयपीओ उभारण्याचा हा कंपनीचा दुसरा प्रयत्न आहे. यापूर्वी, ॲमी ऑरगॅनिक्सने २०१८ मध्ये सेबीकडे प्राथमिक कागदपत्रे दाखल केली होती आणि आयपीओ सुरू करण्यासाठी मार्केट रेग्युलेटरची मंजुरी मिळाली होती. तथापि, पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार तेव्हा त्यांनी आयपीओ फ्लोट केला नाही.

Comments are closed.