आला, आला, आला… तुम्ही वाट पाहत होतात तो फोन अखेर आला

Apple is expected to introduce the Apple Watch Series 7 at an event in September

बऱ्याच दिवसापासून आयफोन 13 कधी येणार याबाबत लोकांत खूप उत्सुकता आहे, कंपनी लवकरच हे मॉडेल लॉन्च करेल अशी चिन्हे दिसत आहेत.

आयफोन 13 लाँच करण्याची तारीख सध्या समोर आलेली नाही. पण अशीही चर्चा सुरु आहे की ॲपलचे नविन मॉडेल १४ सप्टेंबर रोजी लॉन्च केले जाईल आणि याच तारखेला आयफोन 13 लाँचच्या वेळी ॲपल आपले नवीन स्मार्टवॉच ॲपल वॉच सीरीज 7 चे अनावरण करेल.

ब्लूमबर्गचे मार्क गुरमन यांनी खुलासा केला आहे की ॲपल आयफोन 13 लाँच कार्यक्रमात वॉच सीरीज 7 चे अनावरण करेल. त्यांचा असा दावा आहे की ॲपल त्याच्या नवीन स्मार्टवॉचच्या निर्मितीसाठी अडचणींचा सामना करत असला तरी कंपनी १४ सप्टेंबर लाँचच्या तारखेला त्याची घोषणा करेल.

गुरमन असेही म्हटले की, नवीन ॲपल वॉच घोषणेनंतर मर्यादित प्रमाणात उपलब्ध होईल. “मला विश्वास आहे की आम्ही आयफोनसह नेहमीच्या सप्टेंबर इव्हेंट दरम्यान घोषणा होण्याची वाट पाहू, परंतु तेथे मॉडेल्सचे थोड्या प्रमाणात शिपिंग होईल. २०१५ मध्ये अँपल वॉच लाँच इव्हेंट माहीत असणाऱ्यांना हे फार अपरिचित नसावे.

रिपोर्टरने यापूर्वीही म्हटले होते की आगामी ॲपल वॉचला “बिट ऑफ रीडिझाईन” मिळेल. यात वेगवान प्रोसेसर सोबत फ्लॅटर डिस्प्ले आणि अद्ययावत स्क्रीन तंत्रज्ञान असेल.

ॲपल वॉच सीरीज 7 चे डिझाईन रेंडर लीक झाले आहेत. आयफोनसाठी आगामी ॲपल स्मार्टवॉच या वर्षी लॉन्च केलेल्या इतर उत्पादनांप्रमाणेच एकाच डिझाईन मध्ये असेल. टिपस्टर जॉन प्रॉसरचा दावा आहे की ॲपल वॉच सीरिज 7 च्या दोन्ही बाजूंना आयपॅड प्रो आणि आयपॅड एअर मॉडेल्सप्रमाणे सपाट कडा असतील. ॲपल आयफोन 12 ला ही सपाट कडा आहेत. ॲपल वॉच सीरीज 6 ला किंचित वक्र कडा आहेत.

टिपस्टर जॉन प्रॉसरने पूर्वी जाहीर केले होते की ॲपल वॉच अनेक रंगांमध्ये येईल. प्रॉसरने स्मार्टवॉचचे रेंडर हिरव्या आणि निळ्या रंगात शेअर केले. वॉच लाल, सिल्व्हर आणि काळ्या रंगात देखील येऊ शकते.

डिस्प्ले साईज सध्या अज्ञात आहे. ॲपल स्मार्टवॉचची सध्याची लाइनअप ४० मिमी आणि ४४ मिमी ह्या दोन आकारात येते. आपण सीरिज 7 मध्ये हुडच्या खाली वेगवान चिप शक्यतो एस 7 ची अपेक्षा करू शकतो. यात काही फ्लॅगशिप स्मार्टवॉच फिचर्स असण्याची शक्यता आहे.

Comments are closed.