महिंद्रा अँड महिंद्रा का पाळतेय ‘नो प्रॉडक्शन डे’! पण का? वाचा हे!
MAHINDRA and MAHINDRA to have SEVEN 'NO PRODUCTION DAYS' in september due to semiconductor shortages
भारतातील नामांकित कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा सध्या काही प्रमाणात अडचणीत सापडल्याची चिन्हे दिसत आहेत. महिंद्रा अँड महिंद्राच्या ऑटोमोटिव्ह डिव्हिजनला सेमीकंडक्टरच्या पुरवठ्याच्या कमतरतेला सामोरे जावे लागत आहे. जगातील काही भागांमध्ये झालेल्या कोविड लॉकडाऊनमुळे ह्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
यामुळे कंपनी सप्टेंबर २०२१ मध्ये आपल्या ऑटोमोटिव्ह डिव्हिजन प्लांट्समध्ये सुमारे ७ दिवस ‘नो प्रॉडक्शन डे’ पाळणार आहे, ज्यामुळे सप्टेंबर २०२१ मध्ये ऑटोमोटिव्ह डिव्हिजनचे उत्पादन २०-२५ टक्क्यांपर्यंत पर्यंत कमी होण्याचा अंदाज आहे. कंपनीने आज बीएसईला दिलेल्या निवेदनात सांगीतले.
उत्पादन कमी झाल्यामुळे महसूल आणि नफ्यावर देखिल याचा परिणाम होणार आहे. कंपनी हा प्रभाव कमी करण्यासाठी विविध खर्चाचे ऑप्टिमायझेशन करत आहे.
परंतू, XUV7OO च्या रॅम्प-अप आणि लॉन्च योजनांवर याचा कोणताही परिणाम होणार नाही. XUV7OO ची बुकिंग सुरू होण्याची तारीख लवकरच जाहीर केली जाईल.
कंपनीचे ट्रॅक्टर ऑपरेशन्स, ट्रक आणि बस व्यवसाय तसेच 3-चाकी वाहन उत्पादन हे व्यवसाय यामुळे प्रभावित होणार नाही.
सद्यपरिस्थितीत कंपनी काळजीपूर्वक आढावा घेत आहेत आणि सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत.
Comments are closed.