चांगला निर्णय! कोविड १९ मुळे मृत्यू झाल्यास ‘या’ कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या परिवाराला मिळणार २ वर्ष वेतन
Bajaj auto will pay salary for 2 years to family of employees who die of covid
कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळे देशात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. भारत देशात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. अनेक उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. तसेच अनेकांच्या नोकऱ्याही गेल्या आहेत. अशा या कठीण प्रसंगी एक चांगली बातमी समोर येत आहे. देशातील अग्रणी कंपनी ही कोविड १९ अर्थात कोरोनामुळे मृत्यू झाल्यास कर्मचाऱ्यांच्या परिवाराला दोन वर्ष पुर्ण वेतन देत राहणार आहे.
देशातील ऑटोमोबाईल सेक्टरमधील अग्रणी कंपनी असलेल्या बजाज ऑटोने हा निर्णय घेतला आहे. ज्या कर्मचाऱ्यांचा कोविड १९मुळे मृत्यू होईल त्यांच्या परिवाराला कंपनी सलग दोन वर्ष पुर्ण वेतन देणार आहे. तसेच कंपनी त्या कर्मचाऱ्याच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्चही उचलणार आहे. तसेच या पुणे स्थित कंपनीने कर्मचाऱ्यांना दिलेला आरोग्य विमाही पाच वर्षांसाठी वाढवला जाणार आहे.
एका लिंक्डीन पोस्टमध्ये बजाज ऑटोने म्हटले आहे की, ”मदत निधीमध्ये २४ महिन्यांसाठी २ लाख प्रती महिना तसेच दोन मुलांसाठी बारावी पर्यंत शिक्षणासाठी प्रत्येक वर्षाला १ लाख रुपये कंपनी करणार आहे. हा नियम १ एप्रिल २०२०च्या पुढे सर्वांसाठी लागू राहणार आहे. ”
बजाज ऑटोने पुढे म्हटले आहे की, ”एक कर्मचारी क्रेंद्रित कंपनी असलेल्या बजाजच्या माध्यमातून आम्ही कर्मचाऱ्यांसाठी सतत काही ना काही मदत जाहीर करत असतो. आमची मदत केवळ लसीकरणापर्यंत मर्यादीत नाही. आम्ही कोव्हिड केअर सेंटर, टेस्टिंग व हॉस्पिटलमध्ये भरती करण्यापर्यंत मदत करतो.”
यापुर्वी गेल्या वर्षी मे महिन्यात बोरोसिल अँड बोरोसिल रिन्युएबल्स कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी अशीच योजना सुरु केली होती. त्यांनीही कोविड १९ मुळे जीव गमावणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या परिवाराला तब्बल दोन वर्षांचे वेतन सुरु केले होते.
Comments are closed.