बँक खात्याला बॅलन्स ठेवा, प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजनेचा हफ्ता कट होणार आहे

Banks to deduct premium of pradhanmantri suraksha bima yojna before 31st may

तुम्ही जर प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजनेचे ग्राहक असाल तर ३१ मे च्या आधी तुमच्या बँक खात्यात पैसे तयार ठेवा. बँकांनी आपल्या ग्राहकांना मेसेजद्वारे याबाबत माहिती देण्यास सुरुवात केली आहे.

या योजनेचा वार्षिक हफ्ता १२ रुपये सहसा ग्राहकांच्या खात्यामधून २५ मे ते ३१ मे दरम्यान वजा केला जातो. ज्या ग्राहकांनी या योजनेचा पर्याय निवडला आहे त्यांच्याच अकाऊंटमधून हे पैसे वजा होणार आहेत.

प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना ही भारत सरकारकडून राबवली जाणारी अपघात विमा योजना आहे. ही वार्षिक पॉलीसी असून दर वर्षी तिचे नूतनीकरण करावे लागते. या योजनेत सहभागी होण्यासाठी तुम्ही तुमच्या बँकेत अर्ज भरून देऊ शकता किंवा नेटबँकिंग सुविधेचा वापर करूनही हे करू शकता.

या योजने अंतर्गत १८ ते ७० वयोगटातील व्यक्तीचा अपघात किंवा मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसाला २ लाख रुपयांची रक्कम मिळते. पॉलिसीची मुदत १ जून ते ३१ मे अशी एक वर्षाची असते. दरवर्षी १२ रुपये भरून या पॉलिसीचे नूतनीकरण करावे लागते.

Comments are closed.