ही असेल भारती एअरटेलच्या राइट्स इश्यूमध्ये एका शेअर ची किंमत
Bharti Airtel Fixes September 28 As Record Date For Its Rs. 21,000 Crore Rights Issue.
टेलिकॉम क्षेत्रातील जायंट समजल्या जाणाऱ्या भारती एअरटेलचा 21,000 कोटी रुपयांचा राइट्स इश्यू 5 ऑक्टोबर रोजी उघडेल, असे कंपनीने काल 22 सप्टेंबर रोजी जाहीर केले. हा इश्यू 21 ऑक्टोबर 2021 रोजी बंद होईल.
आज झालेल्या बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या बैठकीत ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. कंपनीने असेही नमूद केले आहे की, शेअर होल्डर्सला या इश्यूमध्ये सहभाग घेण्यासाठी ‘रेकॉर्ड डेट’ 28 सप्टेंबर आहे.
इश्यूमध्ये कंपनी “३९२,२८७,६६२ राईट्स इक्विटी शेअर्स” बाजारात आणेल. या इश्यू मध्ये एका शेअर ची किंमत ही ५३५ असेल ज्यात ५ ही फेस व्हॅल्यू आणि ५३० रुपये प्रीमियम असेल.
इश्यू मध्ये सहभाग घेण्यासाठी काय असेल पात्रता?
ज्या ज्या शेअर होल्डर्स कडे १४ किंवा त्यापेक्षा जास्त शेअर्स आहेत ते सगळे यात सहभाग घेऊ शकता. प्रत्येक १४ शेअर्स मागे १ शेअर साठी तुम्ही अर्ज करू शकता.
कधी पर्यंत शेअर्स घेतले तर करता येईल अर्ज?
तुम्ही येत्या शुक्रवारी म्हणजे उद्या पर्यंत जर शेअर्स घेतले तर तुमच्या अकाउंट ला २८ सप्टेंबर पर्यंत शेअर्स येतील आणि तुम्ही यात सहभाग घेऊ शकता.
कंपनीच्या बोर्डाने 29 ऑगस्ट रोजी राइट्स इश्यूद्वारे 21,000 कोटी रुपये भांडवल उभारण्याच्या योजनेला मंजुरी दिली होती.
सुनील मित्तल यांच्या नेतृत्वाखालील असलेली भारती एअरटेल ही टेलिकॉम क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी कंपनी आहे. दूरसंचार नियामकाने अलीकडेच जाहीर केलेल्या ग्राहकांच्या आकडेवारीनुसार, एअरटेलने जूनमध्ये ३८.१ लाख वायरलेस ग्राहक जोडले त्यामुळे आता त्यांचा मोबाइल युजर्स चा आकडा ३५.२ कोटींवर गेला आहे.
व्होडाफोन आयडिया लिमिटेड (व्हीआयएल), या क्षेत्रातील तिसरी कंपनी मात्र या क्षेत्रात टिकून राहण्यासाठी संघर्ष करत आहे.
जूनच्या दरम्यान VIL ने सुमारे ४२.८ लाख ग्राहक गमावले आणि त्यांचा एकूण युजर्सचा आकडा २७.३ कोटींवर घसरला आहे.
Comments are closed.