भारती एअरटेलचे शेअर्स आणि 21000 कोटीचा इश्यू, वाचा नेमक काय आहे प्रकरण

Bharti Airtel rights issue size has been fixed as "up to 392,287,662 Rights Equity shares", Bharti Airtel said.

सध्या भारती एअरटेलच्या शेअरची किंमत फोकसमध्ये आहे, कंपनीचा 21,000 कोटी रुपयांचा राइट्स इश्यू आज उघडला आहे. इश्यूची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2021 आहे, तर इश्यूचा आकार 392,287,662 राईट्स इक्विटी शेअर्स इतका निश्चित करण्यात आला आहे, असे भारती एअरटेलने सांगितले.

राइट्स इश्यू किंमत 535 रुपये प्रति पेड-अप इक्विटी शेअरमध्ये येते, ज्यात 5 रू चे फेस व्हॅल्यू आणि 530 रुपये प्रति इक्विटी शेअर प्रीमियम उपलब्ध आहे.

राईट इंटीलेमेंट रेशीओ रेकॉर्डनुसार पात्र स्टेकहोल्डरकडे असलेल्या प्रत्येक 14 इक्विटी शेअर्ससाठी एक इक्विटी शेअर उपलब्ध होइल.

मेगा फंड उभारणीसाठी एअरटेलला अधिक फायरपावर मिळेल, याचे कारण म्हणजे कारण ही कंपनी टेलिकॉम मार्केटमध्ये अनेक प्रतिस्पर्ध्यांचा सामना करते.

आयआयएफएल सिक्युरिटीजच्या मते, पेड राइट्स इश्यू हा कॅपिटल डिस्ट्रीब्युशन कमी करून पुढे जाण्याचा एक चांगला मार्ग आहे.

काल सकाळी 10:32 वाजता भारती एअरटेल 7.80 रुपये वाढून 688.90 रुपयांवर होती. शेअर्सने 694.25 रुपयांचा इंट्राडे उच्चांक आणि 680.65 रुपयांचा इंट्राडेचा नीचांक गाठला आहे.

24 सप्टेंबर, 2021 आणि 19 ऑक्टोबर, 2020 रोजी हा शेअर अनुक्रमे 52 आठवड्यातील उच्चांक 738.79 आणि 52 आठवड्यातील नीचांक 386.79 रुपयांवर पोहोचला.

Comments are closed.