आज माही सोबत बोलण्याची सुवर्णसंधी, इंडिया सिमेंटचा भन्नाट कार्यक्रम
To celebrate 75 years of India Cements, vice-chairman and managing director N Srinivasan is organising a close encounter of a virtual kind that brings together the two things he is best known for—business and cricket.
इंडिया सिमेंट्स स्थापनेपासूनचे 75 वे वर्षे साजरे करण्यासाठी, फर्मचे उपाध्यक्ष आणि एमडी एन श्रीनिवासन एक व्हर्च्युअल मीटिंग अरेंज करणार आहेत. या मीटिंगमध्ये बिसनेस आणि क्रिकेट यांचं एकत्रीकरण असणार आहे.
CSK च्या यूट्यूब चॅनेलवर 5 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7.30 वाजता इंडिया सिमेंटचे डीलर्स आणि चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेद्रसिंग धोनी यांच्यात चर्चा होइल.
“CSK च्या यूट्यूब चॅनेलवर होस्ट केलेला एक तासाचा लाईव्ह कार्यक्रम लाखो ‘येलो फॅन्स’ आणि इंडिया सीमेंट्सच्या चॅनेल पार्टनर याकरता एक छान उपक्रम असेल.
इंडिया सिमेंटचे उपाध्यक्ष आणि एमडी, यांनी 2008 साली CSK टीम विकत घेतली होती. ते देखील डीलर्सशी संवाद साधतील. तसेच CSK टीमचे सहकारी शार्दूल ठाकूर आणि इम्रान ताहिर हे धोनीसोबत कार्यक्रमात सामील होण्याची शक्यता आहे.
ह्या कार्यक्रमात CSK च्या चाहत्यांना धोनीशी संवाद साधण्याची संधी देखील मिळेल, जो इंडियन प्रीमियर लीगमध्ये CSK चे नेतृत्व करत आहे.
धोनी आणि त्याची टीम चांगली कामगिरी करत आहेत आणि त्यांनी आधीच बाद फेरीत प्रवेश मिळवला आहे.
इंडिया सिमेंट्सने व्यवसायात एकूण 75 वर्षे पूर्ण केली आहेत. 5,000 कोटी रुपयांच्या वार्षिक उलाढालीसह, कंपनी देशातील सर्वात मोठ्या सिमेंट उत्पादकांपैकी एक आहे आणि चेन्नई सुपर किंग्जची प्रमोटर आहे.
IPL सुरू झाल्यावर चेन्नई फ्रेंचाइजी 2008 मध्ये इंडिया सिमेंटला विकली गेली. धोनी तेव्हापासून संघाचे नेतृत्व करत आहे परंतु 2014 मध्ये टीम चेन्नई सुपर किंग्ज क्रिकेट लिमिटेडने विकत घेतली.
Comments are closed.