अमिताभ बच्चन बोलणार आता क्रिप्टोकरन्सीवर, नेमका काय प्रकरण काय?

As the brand ambassador of CoinDCX, Bachchan will be working to raise awareness about cryptocurrency and to popularise it as an emerging asset class, the company noted

बॉलीवूडचा शेहनशाह अमिताभ बच्चन CoinDCX ह्या क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज मोहिमेचा चेहरा म्हणून ओळखले जाऊ शकतात. बच्चन एक्सचेंजचे पहिले ब्रँड ॲम्बेसेडर असतील. ते भारतात क्रिप्टोकरन्सीबद्दल जागरूकता करतील.

क्रिप्टोकरन्सी गुंतवणूक व्यवहार सुरक्षित असतील, तसेच ॲसेट क्लास म्हणून CoinDCX ला लोकप्रिय करणे, हा मोहिमेचा मुख्य उद्देश असेल.

कंपनीच्या निवेदनात असे म्हटले आहे की,“बच्चन यांच्या माध्यमातून, CoinDCX ला हे सांगायचे आहे की युजर्सची सुरक्षा त्यांच्यासाठी प्राथमिकता असेल.याव्यतिरिक्त, ब्रँडचे उद्दीष्ट युजर्सना क्रिप्टो स्पेसबद्दल शिक्षित करणे आहे ”.

भारतातील क्रिप्टो उद्योग बराच वाढत आहे. मागील काही वर्षांमध्ये लाखो भारतीय, क्रिप्टो ॲसेट मिळवत आहे. क्रिप्टो मार्केट 2 ट्रिलियन डॉलरपेक्षा जास्त किमतीचे आहे, ज्यात अधिकाधिक भारतीय गुंतवणूकदार संधी शोधत आहेत.

BeyondLife.club वर नॉन-फंगिबल टोकन म्हणून लिमिटेड एडिशन कलाकृती लाँच करणारे अमिताभ बच्चन एकमेव बॉलिवूड ए-लिस्टर बनले.

CoinDCX चे सह-संस्थापक आणि सीईओ सुमित गुप्ता म्हणाले, ” बच्चन यांना आमचा ब्रँड ॲम्बेसेडर बनवणे हा आमचा सन्मान आहे. स्वतः एक क्रिप्टो गुंतवणूकदार असल्याने आणि स्वतःचे NFT (नॉन-फंगिबल टोकन) सुरू केल्यामुळे, बच्चन यांना क्रिप्टो स्पेसमधील माहिती आहे.

सुरक्षेबाबत नेमक काय ?

बच्चन हे जरी कंपनीचा चेहरा असले तरी सुरक्षा हा प्रकार वेगळा आहे, ते RBI चा देखील चेहरा आहेत. बच्चन ॲपेक्स बँकेच्या अनेक जाहिरातींमध्ये पाहिले जाऊ शकतात.

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत, आरबीआयचे माजी गव्हर्नर डी. सुब्बाराव यांनी बिटकॉईन सारख्या क्रिप्टोकरन्सीसंबंधी चिंता व्यक्त केली होती.

Comments are closed.