भारतातील अनेक रिटेल इन्व्हेस्टर्सना ‘बिग बुल ‘ राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओबद्दल उत्सुकता असते. ‘बिग बुल’च्या कोणत्या स्टॉकने किती नफा कमावला? त्यांची नवी इन्व्हेस्टमेंट कोणत्या स्टॉकमध्ये होणार? याची अनेकजण माहिती घेताना दिसतात. गेल्या एक दीड वर्षांपासून टाटा ग्रुपच्या शेअर्समध्ये मोठी कमाई केल्यामुळे राकेश झुनझुनवाला यांचा पोर्टफोलिओ चर्चेत आहे. पण, त्यांना फॉलो करणाऱ्यांनी हेही लक्षात घेतले पाहिजे की कधीकधी झुनझुनवाला यांनाही नुकसान सोसावे लागते. राकेश झुनझुनवाला यांच्या स्टॉकपैकी एक लुपिची किंमत गेल्या एका महिन्यात तब्बल २७ टक्क्यांनी खाली आली आहे. गेल्या एका महिन्यात, लुपिनचा शेअर ११८२ रुपयांवरून ९२३ रुपयांपर्यंत घसरला आहे.
स्टॉकमध्ये झालेल्या मोठ्या घसरणीमागील कारण सांगताना, प्रॉफिटमार्ट सिक्युरिटीजचे प्रमुख अविनाश गोरक्षकर म्हणाले, “कंपनीला जपान आणि अमेरिकेच्या व्यवसायात काही प्रमाणात नुकसान होत आहे. याशिवाय,कंपनी व्यवस्थापन, त्यांच्या शेवटच्या तिमाहीचे निकाल जाहीर करताना सकारात्मक भाष्य करण्यास असमर्थ झाले. त्यामुळे बऱ्याच इन्व्हेस्टर्सने प्रॉफिट बुकिंग करण्यास प्राधान्य दिले.” गोरक्षकर म्हणाले की, “लोक आता असे फार्मा स्टॉक शोधत आहेत की ज्यात कोविड -19 उत्पादने आहेत. ते म्हणाले की लुपिनकडे अशी कोणतीही कोविड -19 उत्पादने नाहीत. त्याचा फटका कंपनीला बसतो आहे.”
फॅमोटिडाइन, एल-थायरॉक्सिन आणि मेटफॉर्मिन या प्रमुख उत्पादनांमधील किमती कमी झाल्यामुळे, तसेच अल्ब्युटेरोलशी संबंधित पेनल्टी भरण्यात अपयश यामुळे लूपिनचा यूएस मधील व्यवसाय अडचणीत आला आहे.
गुंतवणूकदारांना लुपिनचा शेअर विकण्यासाठी सुचवताना, चॉईस ब्रोकिंगचे एमडी सुमीत बगाडिया म्हणाले, “स्टॉक चार्टवर कमकुवत दिसत आहे आणि मंदीचा कल पुढे असाच चालू राहू शकतो.”
राकेश झुनझुनवाला यांची लुपिन मधील शेअर होल्डिंग
एप्रिल ते जून २०२१ मधील आकडेवारीनुसार राकेश झुनझुनवाला यांच्याकडे लुपिनचे ७२,४५,६०५ शेअर्स आहेत. त्यांचा कंपनीतील स्टेक जवळपास १.६०% टक्के आहे.
Comments are closed.