अबब! दोन वर्षात विकल्या तब्बल दोन लाख सेल्टॉस 

Company is optimistic about the upcoming demand and it's capabilities to fulfill the same

दक्षिण कोरियन ऑटो कंपनी कियाने शुक्रवारी सांगितले की, त्यांनी भारतात उत्पादन सुरु केल्यापासून दोन वर्षांत फ्लॅगशिप एसयूव्ही सेल्टॉसच्या २ लाख युनिट्सची विक्री केली आहे. तसेच इतर युनिटच्या १.५ लाख कारची विक्री केली गेली आहे. किया इंडियाच्या एकूण विक्रीमध्ये सेल्टॉसचा वाटा ६६ टक्क्यांहून अधिक आहे.

सेल्टॉसची एकूण विक्रीपैकी ५८ टक्के त्याच्या टॉप व्हेरिएंटमधून होते. त्यातही ऑटोमॅटिक ऑप्शन ३५ टक्क्यांहून अधिक वाटा उचलते. या गाडीच्या एकूण विक्रीमध्ये डिझेल पॉवरट्रेनचा वाटा हा ४५ टक्के आहे. किया इंडियाचे एमडी आणि मुख्य विक्री आणि व्यवसाय धोरण अधिकारी ताइ-जिन पार्क म्हणाले, “यशाचे नवीन टप्पे नेहमीच प्रेरणा देतात. यामुळे ग्राहकांना अधिक चांगल्याप्रकारे सेवा देण्यासाठी आमचा उत्साह वाढतो. हे बॅक-टू-बॅक माईल स्टोन आमच्या सेवेचा पुरावा आहेत.”

भारतीय प्रवासी वाहन (पीव्ही) बाजारपेठेत, ग्राहकांचा बदलता कल, नवीन फिचर्स बाबतींत वाढती ओढ आणि अत्याधुनिक कनेक्टेड कार तंत्रज्ञानामुळे परिवर्तन होत आहे. किया इंडियाने असेही म्हटले आहे की, “विक्रीचा ब्रँडची तांत्रिक प्रगती आणि भारतीय बाजारपेठेत टिकण्याची हमी देतो आहे . सेल्टॉस  या कामगिरीचा प्रमुख घटक राहिला आहे आणि ७८ टक्क्यांहून अधिक योगदान हे सेल्टॉसचे आहे.”

Comments are closed.