सोलर एनर्जीला अच्छे दिन! – या चार स्टॉक्सला येऊ शकतात चांगले दिवस

Four companies that can be benefit from Solar Energy boom

केंद्र सरकारने २०३० पर्यंत इंस्टॉल रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी ४५० GW (गिगावॅट) पर्यंत करण्याची योजना आखली आहे. यामध्ये सौर ऊर्जेचे प्रमाण २८० GW (६०%पेक्षा जास्त) असणार आहे. म्हणून भारत सौरऊर्जा क्रांतीच्या शिखरावर येण्याची शक्यता आहे.

मार्च २०२१ मध्ये भारताची सौरऊर्जा साठवण क्षमता पाच पटीने वाढून ४० GW झाली आहे, जी २०१६ मध्ये ६.७ GW होती. यामुळे सौरऊर्जा भारतातील वेगाने वाढणारा उद्योग बनला आहे.

या क्रांतीचा ४ कंपन्यांना फायदा होऊ शकतो.

१. टाटा पॉवर – १२५ रुपये 
टाटा पॉवर ही टाटा समूहाची कंपनी आहे. याच कंपनीची टाटा पॉवर सोलर नावाची सबसडीअरी आहे जी सौरऊर्जा सेवांमध्ये अग्रगण्य आहे. कंपनी सोलर मॉड्यूल, सोलर सेल आणि इतर सोलर उत्पादने तयार करते तसेच सोलर प्रोजेक्टसाठी ईपीसी सेवा पुरवते.

टाटा पॉवर सोलरने भारतभर मोठे प्रकल्प कार्यान्वित केले आहेत, ज्यात अनंतपूर येथील १५० मेगावॅट प्लांट, केरळमधील ५० मेगावॅट प्लांट आणि ओडिशामधील ३० मेगावॅट प्लांट यांचा समावेश आहे.

यापूर्वी फर्मने गुजरात येथील धोलेरा सोलर पार्कमध्ये बांधल्या जाणाऱ्या ४०० मेगावॅट प्रकल्पांसाठी लिलाव जिंकला होता.

लेह, लडाखमध्ये बॅटरी ऊर्जा साठवण प्रणालीसह ५० मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याची कंपनीची तयारी आहे. लडाखच्या केंद्रशासित प्रदेशातील हा भारताचा पहिलाच मोठा सौर प्रकल्प असेल.

या प्रकल्पात डिझाईन,अभियांत्रिकी, पुरवठा आणि खरेदी याचे टर्नकी बेसिसवर बांधकाम आणि दहा वर्षांच्या ऑपरेशनचा समावेश आहे.

या प्रकल्पाच्या पूर्णत्वानंतर टाटा पॉवर सोलरची ऑर्डर पाइपलाइन १२,४०० कोटी मूल्यासह ४GW आहे.

२. बोरोसिल रिन्यूएबल्स – २८९ रुपये 
बोरोसिल रिन्यूएबल्स ही भारतातील पहिली आणि एकमेव सोलर ग्लास उत्पादक कंपनी आहे. कंपनीने जानेवारी २०१० मध्ये आपली सोलर ग्लास उत्पादन सुविधा सुरू केली होती.

सोलर पॅनेल ग्लास व्यवसायात, बोरोसिल दररोज ६५० टन ग्लास उत्पादन करते जे डोमेस्टिक मागणीच्या ४०% आहे. तर उर्वरित चीन आणि मलेशियामधून आयात केले जाते.

कंपनी आपल्या सध्याच्या सोलर पॅनेल ग्लास क्षमतेच्या जवळजवळ २०% भाग युरोपमध्ये निर्यात करते. कंपनीचे पुढचे लक्ष हे जर्मनी, स्पेन, पोर्तुगाल, रशिया आणि तुर्की आहे.

५ बिलियन डॉलर्सच्या नियोजित गुंतवणूकीसह कंपनी आपली क्षमता प्रतिदिन ९०० टनापर्यंत वाढविण्याच्या प्रक्रियेत आहे.

बोरोसिल समूहाच्या प्रोजेक्टमध्ये सध्या ४५० टन प्रतिदिन सोलर पॅनल ग्लास तयार करण्याची क्षमता आहे, जी २.५ गीगावॅट सौर उर्जेला पुरेसी आहे.जुलै २०२२ पर्यंत कंपनीचा नवीन प्लांट सुरू होइल.

३. स्टर्लिंग आणि विल्सन सोलर – २६६ रुपये 

स्टर्लिंग आणि विल्सन सोलर ही जागतिक पातळीवर सोलर अभियांत्रिकी, खरेदी आणि कन्स्ट्रक्शन(ईपीसी) सोल्यूशन्स पुरवणारी कंपनी आहे.

कंपनी प्रामुख्याने युटिलिटी स्केलवर सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी प्रोजेक्ट डिझाईन आणि इंजिनीअरींग वर लक्ष केंद्रित करून ईपीसी सेवा पुरवते. प्रोजेक्ट सुरू करण्यापासून ते तो पूर्ण करण्यापर्यंतिच्या सर्व पैलूंचे व्यवस्थापन कंपनी करते.

कंपनीने ऑस्ट्रेलिया, यूएसए, आशिया, आफ्रिका अशा विविध भौगोलिक क्षेत्रांमध्ये १० GW पेक्षा जास्त क्षमतेचे प्रकल्प कार्यान्वित केले आहेत. ज्यात सॉफ्ट बँक, टोटल आणि शेल सारख्या नामांकित ग्राहकांची नावे आहेत. फेब्रुवारी २०२१ पर्यंत कंपनीची ऑर्डर बुक ९६७ कोटी रुपये इतकी आहे.

कंपनीने नुकतीच हायब्रिड एनर्जी पॉवर प्लांट्स,एनर्जी स्टोरेज आणि वेस्ट टू एनर्जी या उपाययोजनांवर काम करण्याची योजना जाहीर केली.

४. वेबसोल एनर्जी – ६८ रुपये 
वेबसोल एनर्जी सिस्टीम भारतातील फोटोव्होल्टॅइक मोनोक्रिस्टलाइन सोलर सेल्स आणि मॉड्यूलची अग्रगण्य निर्माता आहे.

ही कंपनी युरोप (प्रामुख्याने जर्मनी आणि इटली) आणि अमेरिकेत निर्यात-केंद्रित युनिट म्हणून काम करते.

५W ते २२०W पर्यंतच्या उच्च दर्जाच्या उत्पादनांसाठी कंपनीची ओळख आहे. घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक संस्थांच्या मागणीची पूर्तता कंपनी करते.

तंत्रज्ञानाची प्रगती लक्षात घेऊन, वेबसोलने जागतिक दर्जाचे फोटोव्होव्होल्टॅइक सेल्स आणि सोलर मॉड्यूल तयार करण्यासाठी गुंतवणूक केली आहे. यात २५० मेगावॅट सेल्स आणि २५० मेगावॅट मॉड्यूलची उत्पादन क्षमता आहे.

रिन्यूएबल एनर्जीमध्ये गुंतवणूक का करावी?
ग्लोबल वार्मिंग, क्लायमेट चेंज आणि कच्च्या तेलासारख्या उर्जेचे स्त्रोत पर्यावरणास कसे बिघडवत आहेत यावर सतत चर्चा चालू असते.यामुळे जगभरात रिन्यूएबल्स एनर्जीचा वापर करण्याचे पर्याय उपलब्ध केले आहेत.

जसजसे एखादे क्षेत्र प्रगती करत जाते तसेतसे उद्योगात तंत्रज्ञानाच्या प्रगतीलाही मोठा वाव निर्माण होतो. सोलर इंस्टॉलेशनची किंमत कमी करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा शोध लावला जात आहे, जेणेकरून ग्रामीण भागातही अधिक लोक रिन्यूएबल्स एनर्जी स्त्रोत वापरू शकतील.

भारतात रिन्यूएबल्स स्त्रोत वाढीतून नफा मिळवण्याची अपेक्षा असलेल्या गुंतवणूकदारांनी, गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक व्यवस्थापन, व्यवसायिक धोरण आणि इतर सर्व मूलभूत घटकांचा विचार केला पाहिजे.

Comments are closed.