ओला इलेक्ट्रिक – बुकिंगची प्रक्रिया, ईएमआय प्लॅन आणि बरंच काही

The Ola electric scooter can be booked through the official website of the electric two-wheeler manufacturer for a nominal amount of just Rs 499. The company claims that the EMI of Ola scooter will be less than Rs 3000 per month.

भारतातील नामांकित स्टार्टअप कंपनी ‘ओला’ ने भारतातील इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंटमध्ये धडाक्यात एन्ट्री केली आहे. गेल्या आठवड्यात स्वातंत्र्यदिनी भारतीय ग्राहकांसाठी त्यांनी पहिली ई-स्कूटर लाँच केली होती. या स्कुटरची किंमत १ लाख रुपये असून कंपनीने S1 आणि S1 Pro हे दोन व्हेरिएंट ऑफर केले आहेत. ओला इलेक्ट्रिकच्या लाँचच्या आधीपासूनच रेदीदारांमध्ये हा गाडीबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली होती.

ओला इलेक्ट्रिक S1 स्कूटरची एक्स-शोरूम किंमत ९९,९९९ रुपये तर S1 Pro ची किंमत १,२९,९९९ रुपये इतकी आहे. राज्यानुसार किंमती वेगळ्या आहेत. सर्वात स्वस्त ओला इलेक्ट्रिक स्कूटर गुजरातमध्ये, फक्त ७९,९९९ रुपयांत खरेदी केली जाऊ शकते. ओला S1 साठी प्री-लॉन्च बुकिंग या महिन्याच्या सुरुवातीलाच सुरू झाली होती आणि पहिल्या २४ तासांतच १,००,००० हून अधिक गाड्या बुक झाल्या होत्या.

तुम्हाला ही गाडी बुक करायची असल्यास कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर ४९९ रुपयांच्या नाममात्र रकमेवर बुक करता येईल. कंपनीच्या तामिळनाडूमधील फॅक्टरीमध्ये नवीन स्कूटर ची निर्मिती होत आहे. या इलेक्ट्रिक स्कूटर ची विक्री पुढील महिन्यापासून सुरू होईल.

ओलाच्या मते, इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री ८ सप्टेंबरपासून अधिकृतपणे सुरू होईल.ओला तुमची गाडी थेट तुमच्या पोहोच करणार आहे. यामध्ये कोणताही डीलर नसेल. ई-स्कूटर देशभरातील तब्बल १००० शहरांत पोहोचवण्याचे ओलाचे उद्दिष्ट आहे.

ओला इलेक्ट्रिकने म्हटले आहे की त्यांच्या ई-स्कूटरसाठी ईएमआय दरमहा ३००० रु पेक्षा कमी असेल. कंपनीने इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्यासाठी परवडणाऱ्या, ईएमआय योजना देण्यासाठी अनेक बँका आणि वित्तीय संस्थांशी करार केला आहे.

ओला इलेक्ट्रिक स्कूटरला ३.९ kWh बॅटरी पॅक देण्यात येईल जे ८.५ kWh पीक पॉवर स्कूटर साठी उपलब्ध करेल . ७५०W पोर्टेबल चार्जरने स्कूटर केवळ ६ तासात पूर्णपणे रिचार्ज करता येते. तर ५० टक्क्यांपर्यंत चार्ज होण्यासाठी फक्त १८ मिनिटे लागतील. ओला S1 इलेक्ट्रिक स्कूटरने 181 किमीचा क्लेम केला आहे, जो सध्या भारतीय बाजारात उपलब्ध असलेल्या इलेक्ट्रिक दुचाकींच्या रेंजपेक्षा खूप जास्त आहे.

Comments are closed.