आठ कर्मचाऱ्यांपासून सुरु झालेली कंपनी आज देतेय 75000 लोकांना रोजगार, आता येणार IPO

3i Group-backed BVG India, country’s largest pure-play facility management firm, files for Rs 1,200-1,300 crore IPO

सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, देशातील सर्वात मोठी प्युअर-प्ले सर्व्हिस मॅनेजमेंट कंपनी BVG इंडिया लिमिटेडने IPO द्वारे सुमारे 1,200 ते 1,300 कोटी रुपये जमा करण्यासाठी सेबीकडे ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) दाखल केली आहे.

गेल्या काही महिन्यांत कोविडमुळे कंपनीच्या क्वेज कॉर्प, टीम लीज सर्व्हिसेस आणि एसआयएस शेअरच्या किमती वाढल्या आहेत. BVG इंडियाचे भारतीय रेल्वे, राष्ट्रपती भवन, टाटा ग्रुप, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि एक्सेंचर हे ग्राहक आहेत.

संबंधीत सूत्रांनुसार, “ड्राफ्ट पेपर दाखल केले आहेत. सदर IPO शेअर्सच्या प्रायमरी आणि सेकंडरी इश्यूचे मिश्रण असेल”.

अजून एका सूत्राने सांगितले, “सदर लिस्टिंग 3i ग्रुपसाठी महत्वाची ठरेल. उपलब्ध कर्ज कमी करण्यास आणि जनरल कॉर्पोरेट हेतूंसाठी याचा वापर केला जाईल. या व्यक्तीने असेही सांगितले की आयसीआयसीआय सिक्युरिटीज, एचएसबीसी सिक्युरिटीज आणि जेएम फायनान्शियल या बँका इश्यूवर काम करत आहेत.

आणखी एका सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, क्लीनिंग ड्राईव्ह आणि वर्क फ्रॉम मोडमधून ऑफिसेस परत सुरु करणे ह्या गोष्टी सेगमेंटला भरपूर मदत करतील. ही ऑफर डिसेंबर 2021 किंवा Q1CY22 मध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे.

3i ने मार्च 2011 मध्ये कोटक प्रायव्हेट इक्विटी ग्रुप कडून BVG इंडिया मध्ये 27 % स्टेक विकत घेतला होता.

BVG इंडिया एक इंटिग्रेटेड प्लेअर आहे. मेकॅनिक हाउस्कीपिंग, लँडस्केपिंग आणि गार्डनिंग, लॉजिस्टिक्स आणि ट्रान्सपोर्ट, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रिया आणि नागरी आणि विद्युत सेवांसह सुविधा उपलब्ध करते. कंपनी आपत्कालीन रुग्णवाहिका सेवा देखील देते. FY20 मध्ये कंपनीची वार्षिक कमाई सुमारे 2,000 कोटी रुपये होती.

फर्मने 1997 मध्ये 8 लोक आणि एकच क्लायंट असलेली हाउसकीपिंग कंपनी म्हणून सुरुवात केली. कंपनी आता भारतातील सर्वात मोठी इंटिग्रेटेड सर्व्हिस कंपनी आहे, जी 75000 पेक्षा जास्त लोकांना रोजगार देते. एकूण 22 राज्यांमधील 70 शहरांमध्ये 850 पेक्षा जास्त ग्राहकांना कंपनी सेवा देते.

BVG इंडिया, सोडेक्सो इंडिया, एसआयएस, टीम लीज सर्व्हिसेस आणि क्वेस कॉर्प सारख्या प्लेअर्स सोबत स्पर्धा करते. गेल्या सहा महिन्यांत एसआयएस, टीम लीज सर्व्हिसेस आणि क्वेस कॉर्पच्या शेअरच्या किमती अनुक्रमे 24.6 टक्के, 21.93 टक्के आणि 32.37 टक्क्यांनी वाढल्या आहेत.

2016 मध्ये, आयसीआयसीआय व्हेंचर्सने टीमलीज सर्व्हिसेस लिमिटेड आणि फेअरफॅक्स फायनान्शियल होल्डिंग्स-क्वॉड कॉर्प कॉर्पोरेशनने त्यांच्या संबंधित IPO मधून अनुक्रमे 420 कोटी आणि 400 कोटी रुपये उभारले होते.

ग्लोबल मार्केट रिसर्च फर्म टेक्नावियोच्या मते, भारतातील सर्विस मॅनेजमेंट मार्केट 2018-2022 दरम्यान सुमारे 18% च्या CAGRवर 14.98 अब्ज डॉलरने वाढण्याची शक्यता आहे.

Comments are closed.