लागा तयारीला! ऐतिहासिक IPO येतोय, पुढील महिन्यात सेबीकडे होणार कागदपत्रे दाखल

Country's largest insurer LIC is likely to file draft papers with SEBI by November for the largest IPO in country's history

अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC IPO साठी तयारी करत आहे. कंपनी देशाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या IPO साठी नोव्हेंबरपर्यंत सेबीकडे कागदपत्रे दाखल करण्याची शक्यता आहे.

संबंधीत अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, या आर्थिक वर्षात IPO आणण्याचे आमचे लक्ष्य आहे आणि आम्ही यासाठी निश्चित कालमर्यादा ठरवली आहे. डीआरएचपी नोव्हेंबरपर्यंत दाखल होईल.

सरकारने गेल्या महिन्यात LIC च्या मेगा IPO चे व्यवस्थापन करण्यासाठी गोल्डमॅन सॅक्स (इंडिया) सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड, सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि नोमुरा फायनान्शियल ॲडव्हायझरी अँड सिक्युरिटीज (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडसह 10 मर्चंट बँकर्सची नियुक्ती केली होती.

इतर निवडलेल्या बँकर्समध्ये एसबीआय कॅपिटल मार्केट लिमिटेड, जेएम फायनान्शियल लिमिटेड, ॲक्सिस कॅपिटल लिमिटेड, बोफा सिक्युरिटीज, जेपी मॉर्गन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड आणि कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी यांचा समावेश आहे.

DRHP दाखल झाल्यानंतर, मर्चंट बँकर्स जानेवारीपर्यंत गुंतवणूकदारांसाठी जागतिक आणि देशांतर्गत रोड शो आयोजित करतील.

अमरचंद मंगलदास यांची IPO साठी कायदेशीर सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.

सरकारने LIC च्या एम्बेडेड व्हॅल्यूची तुलना करण्यासाठी ॲक्चुरियल फर्म मिलिमन ॲडव्हायझर्स एलएलपी इंडियाची नियुक्ती केली आहे.

सरकार परदेशी गुंतवणूकदारांना LIC मध्ये सहभागी होण्याची परवानगी देण्याचा विचार करत आहे. सेबीच्या नियमांनुसार, विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांना (एफपीआय) पब्लिक ऑफरमध्ये शेअर्स खरेदी करण्याची परवानगी आहे. परंतु LIC च्या कायद्यामध्ये याची तरतूद नाही.

आर्थिक व्यवहारांवरील मंत्रिमंडळ समितीने जुलै महिन्यात LIC च्या IPO प्रस्तावाला मंजुरी दिली होती.

2021-22 साठी 1.75 लाख कोटी रुपयांच्या लक्ष पूर्ण करण्यासाठी LIC ची लिस्टिंग सरकारसाठी महत्त्वपूर्ण असेल.

Comments are closed.