अरे बापरे ग्रेडअप आणि बायजूस ची झाली युती! लवकरच IPO ची ही तयारी…
Byjus take over online test preparation platform Gradeup
Ed-Tech प्लेअर बायजूसने ७ सप्टेंबर रोजी सांगितले की, ऑनलाइन होणाऱ्या परीक्षामध्ये कंपनीचे स्थान बळकट करण्यासाठी कंपनीने ऑनलाइन परीक्षेची तयारी करुन घेणारे प्लॅटफॉर्म ग्रेडअप खरेदी केले आहे. ही खरेदी बायजूस ला ग्रेडअपच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्यास मदत करेल.
ग्रेडअपला आता बायजूस एक्साम प्रीप म्हणून संबोधले जाईल आणि सरकारी नोकरी तसेच पीजी प्रवेश परीक्षा जसे की IAS, GATE, CAT, Bank PO/Clerk, Defence, UGC-NET इत्यादींचा समावेश असलेल्या २५ पेक्षा जास्त परीक्षा श्रेणींमध्ये १५९+ परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा यात समावेश होईल.
खरेदीबद्दल बोलताना बायजूसचे संस्थापक आणि सीईओ रवींद्रन म्हणाले, “प्रत्येक विद्यार्थ्याला उत्तम दर्जाचे शिक्षक आणि कंटेंटद्वारे अधिक चांगल्या प्रकारे शिकण्यास मदत व्हावी याकडे आमचे लक्ष नेहमीच राहिले आहे. ग्रेडअपसह आम्ही पदव्युत्तर स्तराच्या परीक्षांमध्ये आमच्या टेस्ट-प्रीप ऑफरचे प्रमाण वाढवू. ग्रेडअपने आपली क्षमता आधीच सिद्ध केली आहे आणि ह्या अनुभवी टीमसोबत सामील होण्यासाठी आम्ही उत्साहित आहोत.
कोडिंग फर्म व्हाईटहॅट जूनियर, टॉपर, ऑफलाईन टेस्ट प्रीप फर्म आकाश आणि ग्रेट लर्निंगनंतर गेल्या एक वर्षात बायजूसची ही पाचवी खरेदी आहे.
ग्रेडअपचे सीईओ शोभित भटनागर म्हणाले, “लाईव्ह क्लासेस, असेसमेंट आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकत्र करून, आम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत विशेष ऑफर तयार केली आहे. बायजुस च्या सोबत आम्ही आमच्या वाढीला गती देऊ आणि देशभरात सुविधा पोहचवू. आम्ही आमच्या सध्याच्या उत्पादनाची ऑफरिंग अधिक सखोल करण्यासाठी आणि परीक्षांचे आमचे कव्हरेज विस्तृत करण्यासाठी कंटेंटमध्ये वाढ करू. ”
जुलै मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत रविंद्रन म्हणाले होते की कंपनी पुढील १२ ते १८ महिन्यांत आयपीओ आणण्याच्या विचारात आहे. तथापि, कंपनीने गेल्या १८ महिन्यांत एकूण १.५ बिलियन जमा केले आहेत आणि त्यांचे वल्युएशन १६.५ अब्ज डॉलर झाले आहे.
यूबीएस, ब्लॅकस्टोन, एडीक्यू, फिनिक्स रायझिंग आणि झूमचे संस्थापक एरिक युआन यांच्याद्वारे जूनमध्ये कंपनीचा फंड ३५० मिलियन डॉलर होता.
Comments are closed.