चला अजून एक IPO येतोय, इंडिया1 ने दाखल केली कागदपत्रे
इंडिया1 पेमेंट्स लिमिटेडने (पूर्वीचे बीटीआय पेमेंट्स) मंगळवारी सेबीकडे आयपीओद्वारे निधी उभारण्यासाठी कागदपत्रे दाखल केली आहेत. डीआरएचपीनुसार प्रारंभिक शेअर-विक्रीमध्ये १५० कोटी रुपयांच्या इक्विटी शेअर्सचे नवीन इश्यू आणि १,०३,०५,१८० इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल (ओएफएस) यांचा समावेश आहे. ओएफएसमध्ये बँकटेक ग्रुपद्वारे १ लाख, बीटीआय पेमेंट्सद्वारे २५.०८ लाख, इंडिया ॲडव्हान्टेज फंड S3 I द्वारे ४९.९४ लाख, इंडिया ॲडव्हान्टेज फंड S4 I द्वारे २४.८६ लाख, डायनॅमिक इंडिया फंड S4 US द्वारे २.१६ लाख इक्विटी शेअर्सची विक्री समाविष्ट आहे. कंपनी ३० कोटी रुपयांपर्यंत प्री-आयपीओ प्लेसमेंटचा विचार करू शकते.
फ्रेश इश्यूमधून मिळालेली रक्कम कर्जाची परतफेड करण्यासाठी, कंपनीच्या भांडवली खर्चाच्या गरजांसाठी, भारतात एटीएम उभारण्यासाठी आणि इतर कॉर्पोरेट बाबींसाठी वापरली जाईल. बेंगळुरू येथे कंपनीचे मुख्यालय आहे. इंडिया1 पेमेंट्स देशातील एक अग्रगण्य नॉन-बँक एटीएम ऑपरेटर आहे. ३० जून २०२१ पर्यंत, कंपनीने १४ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ८५२० एटीएमचे नेटवर्क उभारले आहे. ज्याला कंपनी “india1ATM” म्हणून ब्रँड करते आहे. कंपनीचा एटीएम व्यवसाय सेमी अर्बन आणि ग्रामीण भागांवर केंद्रित आहे, जेथे ७६१९ एटीएम आहेत.
जेएम फायनान्शियल, एडलवाईस फायनान्शियल सर्व्हिसेस आणि आयआयएफएल सिक्युरिटीज हे या इश्यूसाठी कंपनीचे प्रमुख व्यवस्थापक आहेत.
Comments are closed.