ऑटोमॅटिव्ह क्षेत्रातून येतोय “हा” IPO! संस्थेचे कर्मचारी असाल तर मिळेल सवलत

Sansera Engineering IPO to Open Next Week. Date, Price and Company Key Details

बेंळुरूस्थित ऑटो-कॉम्पोनेंट निर्माता कंपनी संसेरा इंजिनिअरिंग १४ सप्टेंबर रोजी आपला IPO सुरू करेल, आणि १६ सप्टेंबरला तो बंद केला जाईल.

मर्चंट बँकर्सशी सल्लामसलत केल्यानंतर कंपनीने ७३४-७४४ रुपये प्रति इक्विटी शेअरची किंमत निश्चित केली आहे.

१,७२,४४,३२८ इक्विटी शेअर्स IPO द्वारे विद्यमान शेअरहोल्डरकडून विक्रीसाठी ऑफर केले जातील. विक्रीच्या ऑफरमध्ये गुंतवणूकदार क्लायंट एबेन आणि सीव्हीसीआयजीपी II एम्प्लॉइ एबेन यांच्या अनुक्रमे ४८,३६,७२३ आणि ८६,३५,४०८ इक्विटी शेअर्सची विक्री समाविष्ट आहे.

OFS मध्ये क्लायंट एबेन लिमिटेडच्या ८६,३५,४०८ शेअर्सची विक्री, सीव्हीसीआयजीपी II एम्प्लॉइ एबेन चे ४८,३६,७२३ शेअर्स, एस शेखर वासन यांचे २०,५८,०६९ शेअर्स, उन्नी राजगोपाल के, एफआर सिंघवी आणि डी देवराज यांचे प्रत्येकी ५,७१,३७६ शेअर्स आहेत.

गुंतवणूकदार क्लायंट एबेन लिमिटेड आणि सीव्हीसीआयजीपी II एम्प्लॉइ एबेन ची संसेरा इंजिनिअरिंग मध्ये ३५.४० टक्के आणि १९.८३ टक्के शेअरहोल्डिंग आहे.

ऑफरमध्ये कर्मचाऱ्यांसाठी ९ कोटी रुपयांच्या शेअर्सचे आरक्षण समाविष्ट आहे, असे कंपनीने त्याच्या आरएचपीमध्ये म्हटले आहे. कर्मचाऱ्याना हे शेअर फायनल इश्यू किमतीत ३६ रुपयांच्या सवलतीत मिळतील.

गुंतवणूकदार किमान २० इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर २० इक्विटी शेअर्सच्या पटीत बोली लावू शकतात. रिटेल गुंतवणूकदार कमीत कमी एका लॉटसाठी १४७८० रुपयांची गुंतवणूक करू शकतात आणि कमाल गुंतवणूक १३ लॉटसाठी १,९३,४४० रुपये असेल कारण ते आयपीओमध्ये २ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतात.

निम्मे इश्यू पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी ३५ टक्के रिटेल गुंतवणूकदारांसाठी आणि १५ टक्के गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव असतील.

ऑटोमोटिव्ह क्षेत्रामध्ये कंपनी अचूक आणि मशीनीकृत घटक आणि असेम्ब्ली तयार करते जसे की कनेक्टिंग रॉड, रॉकर आर्म, क्रॅन्कशाफ्ट, गिअर शिफ्टर फोर्क, स्टेम कॉम्प आणि ॲल्युमिनियम पार्ट जे इंजिन, ट्रान्समिशन, सस्पेंशनसाठी महत्त्वपूर्ण आहेत.

नॉन-ऑटोमोटिव्ह क्षेत्रामध्ये कंपनी एरोस्पेस, ऑफ-रोड, अग्रीकल्चर आणि इंजिनिअरिंग तसेच इतर भांडवली वस्तू बनवते. आर्थिक वर्ष २१ मध्ये कंपनीने ऑटोमोटिव्ह क्षेत्र आणि बिगर ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील उत्पादनांच्या विक्रीतून अनुक्रमे ८८.४५ टक्के आणि ११.५५ टक्के महसूल मिळवला.

भारतातील दुचाकी OEM ला कनेक्टिंग रॉड, रॉकर आर्म्स आणि गिअर शिफ्टर फोर्क्सचा कंपनी पुरवठा करते. कंपनी भारतातील पॅसेंजर व्हेईकल OEM ला कनेक्टिंग रॉड्स आणि रॉकर आर्म यांचा पुरवठा करते.

आयसीआयसीआय सिक्युरिटीज, आयआयएफएल सिक्युरिटीज आणि नोमुरा फायनान्शियल ॲडव्हायझरी अँड सिक्युरिटीज (इंडिया) हे इश्यूचे प्रमुख व्यवस्थापक आहेत.

Comments are closed.