“ह्या” कारची विक्री वधारली,तर “ह्या” ब्रँड च्या विक्रीत झाली घट..
Passenger vehicle sales in August 2021 increased substantially before festive season.
ऑगस्ट २०२१ मध्ये भारतात कार विक्रीची एकूण आकडेवारी आता समोर आली आहे. यात अनेक कंपन्यांनी विक्रीमध्ये वाढ नोंदवली असताना, काही कार उत्पादकांना मात्र ऑगस्ट २०२० च्या तुलनेत घट सोसावी लागली आहे.
भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने गेल्या महिन्यात ८.७१ टक्के विक्री कमी झाल्याची माहिती दिली. कंपनीने विक्रीतील या तोट्याला जागतिक बाजारात असणाऱ्या चिपच्या कमतरतेला जबाबदार ठरवले ज्यामुळे उत्पादनावर परिणाम झाला.
ऑगस्ट २०२० मध्ये १,१३,०३३ युनिट्सच्या तुलनेत कंपनीने गेल्या महिन्यात १,०३,१८७ वाहने विकली. मारुती सुझुकीने सांगीतले की ऑगस्ट २०२० मध्ये १९,७०९ युनिट्सच्या तुलनेत गेल्या महिन्यात S-Preso आणि Alto च्या २०,४६१ युनिट्सची विक्री केली, ज्यात ३.८१ टक्के वाढ झाली.
परंतू, वॅगनआर, डिझायर, स्विफ्ट, सेलेरियो, बलेनो इत्यादी इतर सब-कॉम्पॅक्ट कारची विक्री गेल्या महिन्यात २६.४३ टक्क्यांनी कमी झाली आहे.
तर एस-क्रॉस, विटारा ब्रेझा, अर्टिगा, एक्सएल ६ इत्यादी युटिलिटी कारची विक्री १५.७२ टक्क्यांनी वाढली आहे, तर सियाझने मागील वर्षी याच कालावधीत १,२२३ युनिट्सची विक्री केली होती ह्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात २,१४६ युनिट्सची विक्री केली आहे, आणि ७५.४७ टक्के वाढ नोंदविली आहे.
दुसरीकडे, टाटा मोटर्सने गेल्या महिन्यात ४८ टक्क्यांची विक्री वाढ नोंदवली, ऑगस्ट २०२० मध्ये १८,२७७ युनिट्स होती ती गेल्या महिन्यात २६,९९६ युनिट्स इतकी झाली. कंपनीने ईव्ही विक्रीत २३४ टक्के वाढ नोंदवली आहे.ऑगस्ट २०२० मध्ये ३०६ इलेक्ट्रिक कार पासून गेल्या महिन्यात १,०२२ युनिट्स पर्यंत कंपनीची मजल गेली आहे.
टोयोटाने १३० टक्के विक्री वाढ नोंदवली आहे, ह्या जपानी ब्रँडने भारतात गेल्या वर्षीच्या ५,५५५ युनिट्सच्या तुलनेत यावेळेस १२,७७२ युनिट्सची विक्री केली.
गेल्या महिन्यात स्कोडानेही लक्षणीय विक्री वाढ नोंदवली आहे,ऑगस्ट २०२० मध्ये १,००३ कारच्या तुलनेत, कंपनीने ऑगस्ट २०२१ मध्ये ३,८२९ कार विकल्या, आणि २८२ टक्के विक्री वाढ नोंदवली. भारतात स्कोडा कुशाक कॉम्पॅक्ट एसयूव्हीची वाढती मागणी लक्षात घेऊन कंपनीने ही वाढ केली.
गेल्या महिन्यात विक्रीत वाढ नोंदवणारी आणखी एक कार निर्माता कंपनी होती एमजी, ह्या ब्रिटिश ब्रँडने ५१ टक्के वाढ नोंदवली, आणि ऑगस्ट २०२१ मध्ये ४,३१५ युनिटची विक्री केली. यापैकी ७०० कारची विक्री ZS EV द्वारे नोंदवली गेली.
Comments are closed.