कॉपर,स्टील सारख्या कमोडिटीशी निगडित माहिती गेले काही दिवस आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. आज अशाच एका कमोडिटीबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न. आजची कमोडिटी आहे कॉफी.
एडलवाईज रिसर्चने नुकताच कॉफीबद्दल एक अहवाल प्रकाशित केला. या अहवालातील काही ठळक गोष्टी या लेखात नमूद करतो आहोत.
१. जगात प्रामुख्याने अरेबिका आणि रोबस्टा या दोन प्रकारच्या कॉफीची लागवड केली जाते.
२. यापैकी अरेबिकाचे प्रॉडक्शन जवळपास ७०% एवढे होते. उरलेला वाटा रोबस्टाचा आहे.
३. क्रूड ऑइल खालोखाल जगभरात सर्वात जास्त मागणी असलेली कमोडिटी म्हणजे कॉफी. जगभरातल्या कॉफीचे व्हॅल्यूएशन करायचे म्हटले तर ते साधारण ४६५ बिलियन डॉलर एवढे होते.
४. जगातल्या एकूण कॉफी प्रॉडक्शनपैकी ९०% हुन अधिक प्रॉडक्शन डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये होते. कॉफीचे सर्वाधिक प्रॉडक्शन घेणारे तीन देश
ब्राझील – ३६%
व्हिएतनाम – २०%
कोलंबिया – १०%
५. भारतातील कॉफीचा वापर – माणशी ९५ ग्रॅम प्रति वर्ष. हाच आकडा २०१९ साली ८५ ग्रॅम एवढा होता.
६. भारतातील लोक दिवसाला ०.०४ कप कॉफी पितात. नेदरलँडमध्ये हाच आकडा सर्वाधिक २.४१ कप प्रति दिवस एवढा आहे.
कॉफी टंचाई –
२०२१-२२ या वर्षात जगभरात कॉफीची टंचाई भासणार आहे. याला कारण म्हणजे कॉफीचे प्रॉडक्शन घेणाऱ्या ब्राझीलसारख्या देशांत पावसाचे कमी झालेले प्रमाण. यामुळेच सगळीकडे कॉफीच्या किंमतीतही गेल्या ४-५ महिन्यांत वाढ झालेली दिसतेय. अरेबिका कॉफीचे प्रॉडक्शन ३५-४०% ने कमी होण्याची शक्यता आहे. याबरोबरच व्हिएतनाममध्ये प्रमाणापेक्षा जास्त पाऊस पडल्याने त्याचा परिणाम कॉफीच्या प्रॉडक्शनवर झाला आहे.
याबरोबरच करोनामुळे कॉफीची वाहतूक करणाऱ्या कंटेनर्सची उपलब्धतासुद्धा कमी झाली आहे. यामुळेसुद्धा कॉफीच्या किंमतीत वाढ होताना दिसतेय.
या सगळ्याचा भारतातील काही स्टॉक्स वर सुद्धा परिणाम होताना दिसतोय. हे स्टॉक आहेत
१. सीसीएल प्रॉडक्ट्स
२. टाटा कन्झ्युमर
३. टाटा कॉफी
४. हॅरीसन मल्यालम
या चारही स्टॉक्स ने गेल्या काही दिवसांत ब्रेकआऊट दिला आहे. कॉफी प्रॉडक्शन बद्दल वर दिलेली माहिती विचारात घेता हे स्टॉक्स येणाऱ्या काळात आणखी चांगली कामगिरी करण्याची शक्यता आहे.
Comments are closed.