चीनमध्ये क्रिप्टोकरन्सी व्यवहार बंद, ‘हे’ आहे कारण
China’s central bank on Friday had said that all cryptocurrency-related transactions are considered illegal.
चीनमधील ॲसेटवर होणाऱ्या क्रॅकडाऊनमुळे क्रिप्टोकरन्सीच्या किमती आज पुन्हा वाढल्या आहेत. शुक्रवारी चीनमधील क्रिप्टो मायनिंग आणि व्यवहारांवर पूर्ण बंदी घालण्याच्या घोषणेनंतर बिटकॉइन 5 टक्क्यांनी वाढून 44,269 डॉलरवर पोहचला.
शुक्रवारी झालेल्या एकूण नुकसानीची भरपाई करून ईथर, 10% नी वाढून 3,167 डॉलरवर पोहोचला. कार्डानोच्या किमती किंचित वाढल्या तर डॉगेकोइन 2% नी वाढून 0.20 डॉलर पर्यंत पोहचले. XRP, Litecoin, Uniswap, Stellar यांनीदेखील गेल्या 24 तासांमध्ये वाढ नोंदविली आहे.
चीनच्या मध्यवर्ती बँकेने शुक्रवारी म्हटले की, ‘क्रिप्टोकरन्सीशी संबंधित सर्व व्यवहार बेकायदेशीर आहेत’. पीपल्स बँक ऑफ चायना (पीबीओसी) ने असेही म्हटले आहे की, त्यांनी फायनान्स इन्स्टिट्युशन, पेमेंट कंपन्या आणि इंटरनेट कंपन्यांना देखील क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंगची सर्व्हिस बंद करायला लावली आहे.
यानंतर, पॉप्युलर ऑफशोर एक्सचेंज हुओबीने देखील नवीन युजर्सना चायना फोन नंबरवर नोंदणी करण्याचे बंद केले. त्यांनी रविवारी एका निवेदनात म्हटले की, “ते चीनमधील युजर्स अकाऊंट हळूहळू ३१ डिसेंबरपर्यंत बंद करतील”.
चीन क्रिप्टोकरन्सीवर कठोर कारवाई करत आहे. क्रिप्टोकरन्सी संबंधीत सर्व व्यवहार देखील बंद करत आहे.
त्यांनी मे मध्ये असे म्हटले होते की, ते क्रिप्टोकरन्सी मायनींग प्रोजेक्ट बंद करणार आहेत. याचे कारण हे ते मोठ्या प्रमाणावर वीज वापरतात असे सांगितले होते.
Comments are closed.