संपत्तीत मोठी घट झाल्यामुळे एलॉन मस्क श्रीमंंतांच्या यादीत तिसऱ्या स्थानी, पाहा कोण झालंय पहिल्या स्थानी विराजमान
जगातील आघाडीची इलेक्ट्रिक कार निर्मिती करणारी कंपनी टेस्ला (Tesla) च्या शेअर्सच्या किंमतीत गेल्या काही आठवड्यांत मोठी घसरण झाली आहेग. गेल्या ५ आठवड्यांत झालेली घसरण ही २०१८ सालानंतरची सर्वात मोठी व सर्वात जास्त सलग आठवडे झालेली घसरण आहे. या आठवड्यात टेस्लाचा शेअर १.५ टक्केने घसरुन ५८०.८८ डॉलरवर आला आहे.
याचाच मोठा फटका कंपनीचा साईओ एलॉन मस्क (Elon Musk) यांना बसला आहे. त्यांच्या एकूण संपत्तीत ८ बिलीयन डॉलरची घट झाली आहे. याचमुळे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या अव्वल स्थानावरुन मस्क यांची घसरण झाली आहे. आता ही जागा ॲमेझॉन (Amazon ) कंपनीचे सीईओ जेफ बेजोस यांनी घेतली आहे. तर दुसऱ्या स्थानी एलव्हीएमएचचे बर्नार्ड अरनॉल्ट (Bernard Arnault) विराजमान झाले आहे. मस्क थेट तिसऱ्या स्थानावर फेकले गेले आहेत.
ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सच्या म्हणण्यानुसार, मस्क यांच्या संपत्तीत ८.०९ बिलीयन डॉलर अर्थात ६० हजार कोटींची घट झाली आहे. २२ मे २०२१ रोजी मस्क यांची एकूण संपत्ती १६२ बिलीयन डॉलर एवढी आहे. भारतीय रुपयांत सांगायचे झाले तर ११ लाख ८१ हजार कोटी एवढी सध्या मस्क यांची संपत्ती आहे. वार्षिक संपत्तीचा विचार करता त्यांच्या संपत्तीत ४.८ टक्केंची घट झाली आहे.
चीन देशात टेस्ला कंपनीच्या गाड्यांच्या विक्रीत २७ टक्केंची मोठी घट झाली. यामुळेच या कंपनीच्या शेअर्सचे भाव कोसळले आहेत. टेस्लाच्या शेअर्समध्ये गेल्या एक महिन्यात जवळपास २० टक्केंची घसरण झाली आहे. २२ एप्रिल रोजी कंपनीचे शेअर्स हे ७१९.५७ डॉलर होते, जे आज ५८०.८८ डॉलरवर आले आहेत.
एलॉन मस्क यांची संपत्ती याचमुळे १९२.४ बिलीयन डॉलरवरुन घसरुन १६२ बिलीयन डॉलर झाली आहे. गेल्या वर्षी टेस्लाच्या शेअर्सच्या किंमतीत तब्बल ७५० टक्केंची वाढ झाल्यामुळे एलॉन मस्क यांनी ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांना मागे टाकत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मान मिळवला होता.
Comments are closed.