पैसापाणी विकली स्टॉक – नॅटको फार्मा 

Weekly Stock Analysis Series

नॅटको फार्मा ही कंपनी FDF म्हणजेच फिनिश्ड डोसेज फॉर्म्युलेशन्सच्या डेव्हलमेंट, मॅन्युफॅक्चअरिंग आणि मार्केटिंग क्षेत्रात कार्यरत आहे. याबरोबच कंपनी API ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इंग्रेडिएंट्समध्ये देखील कार्यरत असून कंपनीकडे ५० हुन अधिक API आहेत. कंपनीला नुकतेच युएसएफडीएकडून कँसरवरील उपचारासाठीच्या जेनेरिक ड्रगसाठी मान्यता मिळाली आहे.

टेक्निकल ॲनालिसिस
कंपनीच्या चार्टने डेली तसेच विकली चार्टवरसुद्धा ब्रेकआऊट दिला आहे.

डेली चार्ट –
डेली चार्टवर आपल्याला कप अँड हॅण्डल हा पॅटर्न स्पष्ट दिसत आहे. तसेच काल ब्रेक आऊट देताना व्हॉल्युम सुद्धा जास्त दिसत आहे. या पॅटर्नच्या नियमानुसार कंपनीचा शेअर येणाऱ्या काळात ११००+ पहायला मिळू शकतो.

विकली चार्ट –
कंपनीच्या शेअरने मागील ३ वर्षाचा हाय तोडत ब्रेकआऊट दिल्याचे विकली चार्टला दिसते आहे.
चार्टवर कप अँड हॅण्डल हा पॅटर्न सुद्धा फॉर्म होताना दिसत आहे. हा पॅटर्न आम्ही विकली चार्ट मध्ये सुद्धा दाखवला आहे. त्यानुसार कंपनीचा शेअर आधी हॅण्डलच्या उंची एवढा आणि नंतर कपच्या उंची एवढा वर जाऊ शकतो. पण चार्ट हा विकली असल्यामुळे यानुसार असलेले टार्गेट पूर्ण करायला काही महिन्यांचा कालावधी लागेल तर त्याच उलट डेली चार्ट नुसार टार्गेट काही आठवड्यात पहायला मिळू शकते.

Comments are closed.