आणखी एक आयपीओ, आता एम्क्युअर फार्मा उतरली मैदानात

Company will look to raise 4500-5000 Cr through fresh issue and OFS

 

वैद्यकीय क्षेत्रातील आघाडीची कंपनी एमक्यूर फार्मास्युटिकल्सने १९ ऑगस्ट रोजी IPO साठी सेबीकडे आपला ड्राफ्ट रेड हियरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) दाखल केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा आयपीओ ४५००-५००० कोटी रुपयांच्या दरम्यान असेल.

या आयपीओमध्ये ११०० कोटी किमतीचा फ्रेश इश्यू तर प्रमोटर्सचे १,८१,६८,३५६ शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत उपलब्ध असतील. प्रमोटर्सपैकी सतीश मेहता २०,३०,००० इक्विटी शेअर, सुनील मेहता २,५०,००० इक्विटी शेअर्सची विक्री करतील. अन्य स्टेकहोल्डर्समध्ये प्रायव्हेट इक्विटी इन्व्हेस्टर बेन कॅपिटल, तसेच काही वैयक्तिक भागधारकांचा समावेश आहे.

कंपनीने म्हटले आहे की ते फ्रेश इश्यूमधून उभा राहिलेला निधी ते कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरतील. क्रिसिलच्या म्हणण्यानुसार, आर्थिक वर्ष २०२१ मध्ये विक्रीवर आधारित सर्वेक्षणानुसर, एमक्युअरला भारतातील १२ वी सर्वात मोठी फार्मास्युटिकल कंपनी म्हणून स्थान देण्यात आले आहे, गायनॅकॉलॉजी, ब्लड आणि एचआयव्हीशी निगडित अँटीव्हायरल उपचारात्मक क्षेत्रात ही कंपनी अग्रेसर आहे. तसेच कंपनी सध्या सध्या कोविड -19 लस विकसित करत आहे. यामुळे ७० हुन अधिक देशांमध्ये आपली उत्पादने नेण्यास कंपनीला मदत होईल.

अॅक्सिस कॅपिटल लिमिटेड, बोफा सिक्युरिटीज इंडिया लिमिटेड, क्रेडिट सुईस सिक्युरिटीज (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड, जेएम फायनान्शियल लिमिटेड हे कंपनीचे ग्लोबल को-ऑर्डिनेटर आणि बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत तसेच बीओबी कॅपिटल मार्केट्स लिमिटेड हे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत.

Comments are closed.