ओला इलेक्ट्रिक – विक्री पासून फायनान्सपर्यंत सगळी माहिती एकाच ठिकाणी 

Delivery for the electric scooter will start from October 2021

इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादन करणारी ओला कंपनी  आजपासून आपल्या इलेक्ट्रिक ओला S1 स्कूटरची विक्री सुरु करणार आहे. S1 स्कूटरची विक्री सुरू करण्यासाठी निवडलेला दिवस हा जागतिक ईव्ही दिन म्हणून ओळखला जातो. पारंपरिक इंधनाऐवजी इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरासाठी प्रोत्साहन देणारा म्हणून हा दिवस ओळखला जातो.

ओला इलेक्ट्रिकने ७ सप्टेंबर रोजी एका निवेदनात म्हटले आहे, की S1 स्कूटरसाठी EMI दरमहा २९९९ रुपयांपासून सुरू होईल.

“जर तुम्हाला फायनान्सची गरज असेल तर,OFS (ओला फायनान्शियल सर्व्हिसेस) ने आयडीएफसी फर्स्ट बँक, एचडीएफसी आणि टाटा कॅपिटलसह काही आघाडीच्या बँकांशी करार केला आहे. याद्वारे तुम्ही तुमच्या गाडीला फायनान्स मिळवू शकता. ”

ओला S1 इलेक्ट्रिक स्कूटरची ऍडव्हान्स व्हर्जन असलेल्या ओला S1 प्रो साठी ईएमआय ३१९९ रुपयांपासून सुरू होईल.

कंपनीने म्हटले आहे की, एचडीएफसी बँक पात्र ग्राहकांना ओला आणि ओला इलेक्ट्रिक ॲप्सवर काही मिनिटांत कर्ज मंजूर करेल. तसेच टाटा कॅपिटल आणि आयडीएफसी फर्स्ट बँक डिजिटल केवायसीवर प्रक्रिया करुन पात्र ग्राहकांना त्वरित कर्ज मंजुर करतील. जर तुम्हाला फायनान्सची गरज नसेल तर तुम्ही फक्त ओला S1 साठी २०,००० रुपये आणि ओला S1 प्रो साठी २५,००० रुपये ॲडव्हान्स देऊ शकता. उरलेली रक्कम गाडी ताब्यात घेताना भरावी लागेल.

ओला इलेक्ट्रिकने सांगितले, गाड्यांची डिलिव्हरी ऑक्टोबर २०२१ पासून सुरू होईल.त्याच महिन्यापासून, कंपनी टेस्ट राइड देणेदेखील सुरु करेल. टेस्ट राईड घेतल्यावर तुम्हाला गाडी आवडली नाही तर तुम्हाला ऑर्डर कॅन्सल करण्याचा पर्यायदेखील आहे. मात्र हे करण्याआधी तुमची गाडी ओला फॅक्टरीमधून शिप झाली नसली पाहिजे.

वाहन विम्यासाठी, खरेदीदार ओला आणि ओला इलेक्ट्रिक ॲप्सद्वारे स्कूटरचा विमा उतरवू शकतात. कंपनीचा विमा पार्टनर आयसीआयसीआय लोंबार्ड आहे. कंपनीने म्हटले आहे की, गाडीच्या रजिस्ट्रेशनसाठी १ वर्ष ओन डॅमेज आणि ५ वर्ष थर्ड पार्टी इन्श्युरन्स घेणे बंधनकारक असेल. तसेच खरेदीदार,पर्सनल ॲक्सिडेंट कव्हर, झिरो डेप आणि रोडसाईड असिस्टंस हे पर्यायदेखील निवडू शकतात. ओला S1 बॅटरीवर कंपनी तीन वर्षांची वॉरंटी देईल. गाडीसाठी वॉरंटी, तीन वर्षे किंवा ४०००० किमी वापर यापैकी जे आधी पूर्ण होईल तोवर वैध असेल.

Comments are closed.