फ्लिपकार्ट महाराष्ट्रात निर्माण करतेय रोजगाराच्या नवीन संधी

Company set to open four new facilities in Maharashtra

वॉलमार्ट संचालित ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट, महाराष्ट्रात ४००० नवीन रोजगार निर्माण करण्याचा विचार करत आहे. यासाठी ते चार ठिकाणी आपली व्यवसाय केंद्रे विस्तारित आहेत. भिवंडी आणि नागपुर येथे ही चार व्यवसाय केंद्रे असतील. याचा मुख्य उद्देश हा राज्यातील स्थानिक विक्रेत्यांना पाठिंबा देणे हा असेल.

कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे,की ही नवीन केंद्रे ७ लाख चौरस फूटांवर विस्तारली जातील. यातून जवळपास ४००० रोजगाराच्या संधी निर्माण होतील. त्याशिवाय स्थानिक विक्रेत्यांना संपूर्ण भारतातील  बाजारपेठेत प्रवेश करण्यास मदत करतील.

सप्लाय चेनच्या बाबतीत कंपनीने महाराष्ट्राला मुख्य केंद्र म्हणून वर्गीकृत केलं आहे. विद्यमान सुविधांसह,फ्लिपकार्टकडे राज्यात एकूण १२  सप्लाय चेन केंद्रे उपलब्ध आहेत. ही केंद्रे जवळपास २३ लाख चौरस फूट क्षेत्रामध्ये पसरलेली आहेत. कंपनी यातून २०००० रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत आहे.

“नवीन गुंतवणूकीमुळे राज्यातील ई-कॉमर्स क्षेत्राला चालना तर मिळेलच शिवाय स्थानिक विक्रेत्यांचाही फायदा होईल. यातूनच स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.” असे फ्लिपकार्टकडून सांगण्यात आले. गेल्या वर्षीच्या तुलनेत राज्यात विक्रेते ३० टक्क्यांनी वाढले आहेत .

राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी फ्लिपकार्टच्या महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

Comments are closed.