स्मॉलकेसवर अमेझॉन आणि प्रेमजींचा विश्वास, केली मोठी गुंतवणूक 

Funds will be used to offer better products for the retail investors

स्मॉलकेस, या आघाडीच्या फिनटेक कंपनीने C सिरीज फंडिंग राऊंडमध्ये ४० मिलियन डॉलर्सची गुंतवणूक मिळवली आहे. या फंडिंग राउंडमध्ये अमेझॉन संभव व्हेंचर्स फ़ंड, प्रेमजी इन्व्हेस्ट, फेरींग कॅपिटल, सिकोईया कॅपिटल इंडिया, ब्लूम वेंचर्स, बीनेक्स्ट, डीएसपी ग्रुप, अरकम वेंचर्स, डब्ल्यूईएच वेंचर्स, एचडीएफसी बँक ग्रुप आणि उत्पल शेठ यांनी भाग घेतला. या राऊंडनंतर स्मॉलकेसने उभारलेल्या एकूण फंडिंगची रक्कम ६० मिलियन डॉलर्स एवढी झाली आहे.

अमेझॉनच्या प्रवक्त्याने सांगितले की,”या वर्षी एप्रिलमध्ये, आम्ही सुरुवातीच्या टप्प्यातील टेक स्टार्ट-अपमध्ये गुंतवणूक करण्यासाठी २५० मिलियन डॉलर्सचा अमेझॉन संभव व्हेंचर फंड (ASVF) लाँच केला आहे. या फंडाचा एक भाग म्हणून, आम्ही नाविन्यपूर्ण  उत्पादने ऑफर करण्यासाठी स्मॉलकेससह पार्टनरशीप करण्यास उत्सुक आहोत. उत्पादनाची निवड करण्यासाठी अधिकाधिक पर्याय आणि वापरण्यास सुलभता यामुळे ग्राहकांना इक्विटी मार्केटमध्ये सहभागी होण्यासाठी अतिरिक्त चॅनेल उपलब्ध होईल.”

या फंडिंग राऊंडमधून उभ्या केलेल्या निधीचा वापर हा रिटेल इन्व्हेस्टर्ससाठी अधिक चांगली उत्पादने लाँच करण्यासाठी केला जाईल. यामुळे स्मॉलकेसच्या पार्टनर्ससाठी एक चांगला प्लँटफॉर्म निर्माण होईल. याद्वारे एक इकोसिस्टिम तयार होईल.

स्मॉलकेसचे सीईओ वसंत कामत म्हणाले, “गेल्या 2 वर्षात भारतीय गुंतवणूकदारांनी इक्विटी मार्केटमध्ये लक्षणीय रस घेतला आहे. लाखो नवीन गुंतवणूकदारांसाठी स्टॉक आणि ईटीएफ (एक्सचेंज-ट्रेडेड फंड) चे मध्ये पैसे गुंतविण्यासाठी स्मॉलकेस एक प्रमुख दुवा बनला आहे.”

सप्टेंबर २०२० मध्ये मिळालेल्या सिरीज बी फंडिंग नंतर स्मॉलकेसचे एकूण वापरकर्ते ३० लाखांपेक्षा जास्त झाले आहेत. स्मॉलकेसमध्ये होणारे व्यवहार १२,५०० कोटी रुपयांपर्यंत वाढले आहेत. भारतातील १२ टॉप ब्रोकरेज, पब्लिशिंग प्लॅटफॉर्म, १२५ पेक्षा जास्त  इन्व्हेस्टमेंट मॅनेजर आणि ५० हून अधिक डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे ग्राहक स्मॉलकेसचा लाभ घेत आहेत.

Comments are closed.