एखाद्या लग्नाच्या खर्चापेक्षा महाग असलेले परदेशातील शिक्षण घेण्यासाठी पैसा कसा गोळा करावा?
An explainer on different funding options for high education abroad
परदेशातील नामांकित विद्यापीठात शिकणे हे आता केवळ एक फॅड राहिलेले नाही. फक्त श्रीमंतांची मुलेच परदेशात शिकू शकतात अशीही परिस्थिती आता राहिलेली नाही. मध्यमवर्गाच्या खर्च करण्याच्या वाढत्या क्षमतेमुळे अनेक विद्यार्थ्यांचे परदेशात शिकण्याचे स्वप्न साकार होऊ शकते.
भारतात करोनाच्या साथीने इतर अनेक गोष्टींवर परिणाम केलेला असला तरी यामुळे भारतातून परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येवर फारसा परिणाम झालेला दिसत नाही. जानेवारी २०२० मध्ये कॉमन अॅपद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार, जगभरातील आंतरराष्ट्रीय विद्यार्थी अर्जदारांच्या संख्येत १०% वाढ झाली आहे. यातील भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत २८५ वाढ झालेली आहे.
तर,हे सर्व विद्यार्थी परदेशात शिकण्यासाठी पैसा कुठून आणतात? ट्युशन फीज, राहण्याचा खर्च, प्रवास खर्च इ. या सगळ्या गोष्टींसाठी एखाद्या भारतीय लग्नात होणाऱ्या खर्चापेक्षा जास्त पैसा लागतो. मग हा पैसा उभा करण्यासाठी नक्की कोणकोणते पर्याय आहेत?
सेल्फ फायनान्स
opendoorsdata.org च्या मते, एकूण आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांपैकी 85 टक्क्यांहून अधिक विद्यार्थी परदेशात आपले शिक्षण स्वतःच्या खर्चाने करणे पसंत करतात. काही विद्यार्थी फॅमिली सेव्हिंग्जचा वापर करून थोडा खर्च भागवतात. तर काहीजण शिष्यवृत्ती आणि पार्ट टाईम जॉबचा अवलंब करतात.
सेक्युअर्ड शैक्षणिक कर्ज
अनेक बँका,आणि NBFCs घर/जमीन यावर शैक्षणिक कर्ज देतात. यामुळे टॅक्स सेव्हिंग्जसुद्धा होते. कर्जाची परतफेड करण्याची सुरुवात पदवी पूर्ण झाल्यावर सहा महिन्यांनी होते. तुम्हाला नोकरी असली अथवा नसली तरी पदवी पूर्ण केल्यानंतर सात वर्षांच्या आत संपूर्ण कर्जाची परतफेड करणे आवश्यक असते. बँकांकडून एकूण खर्चाच्या ८५-९०% तर NBFC कडून १००% पर्यंत कर्ज उपलब्ध होते. बँकाकडून कर्ज घेतल्यास त्यावर कमाल मर्यादा असू शकते. NBFC च्या बाबतीत मात्र अशी कमाल मर्यादा बऱ्याचदा नसते.
अनसेक्युअर्ड शैक्षणिक कर्ज
आणखी एक पर्याय म्हणजे अशा संस्थांकडून कर्ज घ्यायचे की ज्यांच्याकडे काहीच तारण ठेवण्याची आवश्यकता नसते. हे कर्ज तुमच्या आर्थिक स्थितीवर आधारित दिले जाते, उदाहरणार्थ, तुमचा क्रेडिट स्कोअर. तथापि, हे काही प्रमाणात धोकादायक असल्याने, ते अधिक महाग असू शकते. या कर्जामध्ये तुम्हाला जास्त व्याज आकारले जाऊ शकते.या कारणास्तव विद्यार्थ्यांना परतफेडीच्या कोणत्याही अनुकूल अटी मिळू शकत नाहीत. अनेक बँका आणि NBFC ला शिक्षण घेत असतानाच तुम्हाला व्याज द्यावे लागते.
आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था
विद्यार्थ्यांमध्ये ट्रेंडिंग असलेला पर्याय म्हणजे आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून शैक्षणिक कर्ज घेणे. ते कोलॅटरलसह किंवा त्याशिवाय परकीय चलनात कर्जाची रक्कम प्रदान करू शकतात. या संस्था व्याजदर ठरवताना भविष्यात कर्जदाराची परतफेड करण्याची क्षमता कशी असेल याचा विचार करतात. म्हणूनच बँका किंवा NBFC पेक्षा कमी व्याज दर देखील देऊ शकतात.
एसआयपी गुंतवणूक
हा पर्याय आपण किती लवकर सुरू करता यावर अवलंबून आहे. हा पर्याय नोकरी करत असलेल्या मुलांसाठी अधिक योग्य आहे.
पगार मिळत असलेल्या मुलांसाठी एसआयपी ही एक चांगली इन्व्हेस्टमेंट योजना आहे. नोकरीत असलेल्या आणि उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये एसआयपी पर्याय गेल्या काही वर्षांपासून लोकप्रिय होताना दिसतो आहे.
प्रत्येक विद्यार्थी वेगळा असतो. म्हणून, पुढे जाण्यापूर्वी प्रत्येक पर्यायाचे फायदे आणि तोटे लक्षात घेणे महत्वाचे आहे.
Comments are closed.