LIC कडे डेथ क्लेम करायचा आहे? ह्या गोष्टी पाळल्याच पाहिजेत

Step-by-Step guide on submitting a death claim with LIC

जर तुम्ही एलआयसी पॉलिसीधारकाचे नॉमिनी असाल,तर या गोष्टी लक्षात ठेवल्याच पाहिजे.

जर LIC पॉलिसी धारकाचा मृत्यू झाला असेल तर क्लेम दाखल करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑफलाइन केली जाते.यासाठी लागणारी सगळी कागदपत्रे आणि त्यावर संबंधित इन्शुरन्स एजंटची सही यांची पूर्तता करूनच अप्लाय करावे.

स्टेप बाय स्टेप प्रोसेस पुढीलप्रमाणे

1) प्रथमतः नाॅमिनी ने संबंधित LIC कार्यालयात जाऊन मृत व्यक्तीबद्दल आवश्यक माहिती द्यावी. त्यानंतर तुमच्या खात्यात रक्कम जमा करण्याकरिता तेथील अधिकारी तुम्हाला फॉर्म क्र.3783,3801आणि NEFT हे 3 फॉर्म देतील .

2) तुम्हाला सदर मृत व्यक्तीचे मूळ मृत्यू प्रमाणपत्र, मूळ पॉलिसी बॉण्ड, नॉमिनीचे पॅन कार्ड, नॉमिनीच्या आधार कार्डची एक प्रत, मतदान ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पासपोर्ट आणि मृत पॉलिसीधारकाचा कोणताही आयडी पुरावा (शक्यतो आधार कार्ड) लागेल. ही सर्व कागदपत्रे सेल्फ अटेस्टेड करावी लागतील.

3) या सर्व कागदपत्रांसह नाॅमिनीला एक इंटिमेशन लेटर द्यावे लागेल, ज्यात संबंधित व्यक्तीच्या मृत्यूचा दिनांक,ठिकाण आणि मृत्यूचे कारण यांची माहिती द्यावी लागते.

4) NEFT फॉर्म सोबत,नाॅमिनी ने कॅन्सल्ड चेक लीफ आणि बँक पासबुकची प्रत जोडावी.यात खातेदाराचे नाव,खाते क्रमांक आणि IFSC कोडचा स्पष्ट उल्लेख असावा.जर बँकेच्या पासबुकची फोटोकॉपी येथे जोडलेली नसेल तर कागदपत्रे स्वीकारली जात नाहीत.

5) नाॅमिनी ने ज्या कागदपत्रांची पूर्तता केली आहे, त्यांची मूळ प्रत व्हेरिफिकेशन साठी सोबत ठेवावी, जसे की पॅन कार्ड,संबंधित म्रृत व्यक्तीचे ओळखपत्र आणि मूळ बँक पासबुक इ.

6) संबंधित अधिकारी मूळ पासबुक पडताळून पाहिल्यानंतर सर्व डॉक्युमेंट्स स्वीकारून डेथ क्लेमसाठी प्रोसेस करेल. एकूण रक्कम जमा करण्यापूर्वी LIC इतर कागदपत्रे ही मागू शकते.

LIC शाखेत कागदपत्रे जमा केल्यानंतर,पोहचपावती घेण्यास विसरू नका. जर जास्तीचे कागदपत्रे लागले नाहीत तर संबंधित व्यक्तीला एका महिन्याच्या कालावधीत संपूर्ण रक्कम मिळण्याची शक्यता असते .परंतु जर एका महिन्याच्या आत तुमच्या बँक खात्यात कोणतेही क्रेडिट नसेल, तर संबंधित LIC शाखेला भेट द्यावी.

Comments are closed.