या कंपन्या फसल्या अमेझॉन-फ्युचर रिटेल वादात – वाचा सविस्तर

फ्युचर रिटेलच्या स्वतंत्र संचालकांनी पाठवलेल्या दुसऱ्या पत्रानुसार फ्युचर रिटेलचे प्रमोटी गूगल, सॉफ्टबँक, वॉलमार्ट, पेटीएम, ओला, स्विगी, अंबानी ग्रुप, टेन्संट, नस्पर्स, इबे यांसारख्या कंपन्यांना शेअर्स विकू शकणार नाहीत.

कॉर्पोरेट सेक्टरमध्ये फ्युचर रिटेल आणि अमेझॉनमधील वाद भरपूर गाजत आहे. सदर प्रकरण कोर्टात दाखल आहे आणि कंपन्यांत पत्रव्यवहार देखील सुरू आहे.

फ्युचर रिटेलच्या स्वतंत्र संचालकांनी पाठवलेल्या दुसऱ्या पत्रानुसार फ्युचर रिटेलचे प्रमोटी गूगल, सॉफ्टबँक, वॉलमार्ट, पेटीएम, ओला, स्विगी, अंबानी ग्रुप, टेन्संट, नस्पर्स, इबे यांसारख्या कंपन्यांना शेअर्स विकू शकणार नाहीत.

पत्रात असे नमूद केले आहे की, “प्रत्येक प्रमोटर याद्वारे सहमत आहे, करार करतो आणि वचन देतो की तो कोणत्याही सिक्युरिटीज हस्तांतरित करणार नाही.

वरील कंपन्या ‘शेड्यूल II- प्रतिबंधित व्यक्तींची यादी’ या कलमांतर्गत सूचीबद्ध केल्या आहेत.

एका आठवड्याहून कमी कालावधीतील हे दुसरे पत्र आहे, ज्यात अमेझॉनवर माहिती लपविल्याचा आरोप करण्यात आला आहे आणि CCI ने नोव्हेंबर 2019 मध्ये Amazon-Future Coupons Private Ltd (FCPL) डीलला दिलेला होकार मागे घेण्याची विनंती केली आहे. फ्युचर कूपन प्रायव्हेट लिमिटेड (FCPL) मधील अमेझॉनच्या गुंतवणुकीच्या पूर्व-कराराच्या वाटाघाटी नोंदीत असे आढळले की,अमेझॉनने त्याच्या CCI ऍप्लिकेशनमध्ये केलेले निवेदन “आंतरिक पत्रव्यवहाराचे पूर्णपणे विरोधाभास” आहे.

Comments are closed.