जागतिक गुंतवणूकदारांचा LIC कडे ओढा, IPO ला फायदा होण्याची शक्यता
भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) च्या येणाऱ्या IPO च्या अँकर इश्यूमध्ये जागतिक गुंतवणूकदारांनी लक्ष घातल्याचे निदर्शनास येत आहे.
भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) च्या येणाऱ्या IPO च्या अँकर इश्यूमध्ये जागतिक गुंतवणूकदारांनी लक्ष घातल्याचे निदर्शनास येत आहे.
ब्लॅकरॉक, ब्लॅकस्टोन, गवर्नमेंट ऑफ सिंगापूर इंवेस्टमेंट, अबू धाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी आणि कॅपिटल इंटरनॅशनल सारख्या गुंतवणूकदारांनी IPO च्या आधी अँकर बुक वाटपासाठी LIC कंपनीशी प्राथमिक चर्चा केल्याचे समजते.
वित्त मंत्रालयाने अद्याप LIC IPO साठी टाइमलाइन निश्चित केलेली नसली तरी, गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभाग (DIPAM) चे सचिव तुहिन कांता पांडे यांनी यापूर्वी सांगितले होते की, सरकार जानेवारी ते मार्च तिमाहीत IPO संबंधित शेअर विक्री सुरू करू शकते.
अँकर गुंतवणूकदारना कंपनीचा IPO उघडण्यापूर्वी शेअर्सचे वाटप केले जाते. यामुळे लवकरच लिस्टिंग होणाऱ्या कंपनीच्या मागणीला वाव मिळतो, कारण अँकर गुंतवणूकदार कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सखोल संशोधन करतात असे मानले जाते.
अँकर बुक ही या संस्थात्मक गुंतवणूकदारांची यादी आहे. मजबूत अँकर बुकचा आधार असलेला IPO बाजारात चांगली कामगिरी करतो. अँकर गुंतवणूकदारांशी चर्चा अगोदरच केली जात असली तरी शेअर वाटप IPO च्या एक दिवस आधी केले जाते.
मिळालेल्या माहितीनुसार या इश्यूचे व्यवस्थापन करणार्या गुंतवणूक बँका, कॅनेडियन पेन्शन व्यवस्थापक CPPIB आणि CDPQ, Brookfield, California University Endowment आणि Kuwait Investment Authority चर्चा करतील.
Comments are closed.