रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने HDFC बँकेवरील आठ महिन्यांची बंदी उठवली आहे.गेल्या दोन वर्षांत बँकेच्या प्लॅटफॉर्म वर डिजिटल बँकिंग, कार्ड आणि पेमेंटशी संबंधित अनेक मुद्दे यांत त्रुटी आढळल्या होत्या, त्यामुळे 3 डिसेंबर पासून बँकेला, नवीन क्रेडिट कार्ड जारी करण्यास आणि कोणताही नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म लॉन्च करण्यापासून प्रतिबंधित करण्यात आले होते.
नवीन कार्ड जारी करण्यावर निर्बंध आल्यामुळे,एचडीएफसी बँकेने, (भारतातील सर्वात मोठी क्रेडिट कार्ड जारी करणारी कंपनी) गेल्या काही महिन्यांत मार्केट शेअर गमावला होता. त्यामुळे बँकेच्या क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांची संख्या नोव्हेंबर २०२० मधील 15.4 मिलियन वरून मे 2021 मध्ये 14.9 मिलियन वर आली आहे.
पण,जून अखेरीस माध्यमांशी बोलताना बँकेच्या व्यवस्थापनाने विश्वास व्यक्त केला की, नवीन कार्ड जारी करण्यावरील बंदी उठवल्यानंतर ते क्रॉस सेलिंगद्वारे गमावलेल्या वेळेची भरपाई करतील.
एचडीएफसी बँकेचे पेमेंट्स,कन्झ्युमर फायनान्स, डिजिटल बँकिंग आणि आयटीचे ग्रुप हेड पराग राव म्हणाले की, आरबीआय जेव्हाही बंदी हटवेल तेव्हा बँक बाजारात जोरदार पुनरागमन करेन. गेल्या सात महिन्यांत बँकेने जुन्या त्रुटी दूर केल्या आहेत. आणी नविन प्रणाली उपलब्ध केली आहे जेणेकरून योग्य ते निष्कर्ष लवकरात लवकर आरबीआयला सादर केले जातील.
या बातमीच्या जोरावर बँकेच्या शेअरने आज गॅप अप ओपनिंग देत जवळपास १.५% ची उसळी मारली.
Comments are closed.