अबब! एफएमसीजीमध्ये पगाराची कोटीच्या कोटी उड्डाणे

Highest paid FMCG companies CEO's and their salaries.

नेस्ले इंडियाचे अध्यक्ष आणि एमडी सुरेश नारायणन हे एचयूएलचे सीएमडी संजीव मेहता यांना मागे टाकून भारतातील एफएमसीजी उद्योगातील सर्वाधिक पगार घेणारे सीईओ बनले आहेत. CY2020 साठी नेस्लेच्या वार्षिक अहवालानुसार नारायणन यांनी एकूण 17.19 कोटी रुपये वेतन घेतले, जे CY19 मध्ये घेतलेल्या 16.17 कोटीच्या तुलनेत 6.3 टक्क्यांनी वाढले आहे. नेस्ले जानेवारी ते डिसेंबर अकाउंटिंग वर्ष मानते.

दरम्यान मेहता यांचे एकूण पॅकेज,आर्थिक वर्ष 2020 मध्ये 19.42 कोटी रुपये होते. आर्थिक वर्ष 21 मध्ये 21 टक्क्यांनी घटून 15.4 कोटी रुपये झाले. या वेतन कपातीसह मेहता आता देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक वेतन घेणारे एफएमसीजी एक्झिक्युटिव्ह आहेत. त्यानंतर मारिकोचे सौगाता गुप्ता 14.02 कोटी रुपये वेतन घेतात.

कंपनीच्या वार्षिक अहवालांनुसार नारायणन यांचा पगार नेस्ले इंडियाच्या कर्मचाऱ्यांच्या सरासरी पगारापेक्षा 137 पट जास्त आहे,तर मेहता यांचा एचयूएल कर्मचाऱ्यांच्या सरासरी पगारापेक्षा 122 पट जास्त आहे. गुप्ता यांचा पगार 123 पट जास्त होता.

FY19 मध्ये, गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्सचे एमडी आणि सीईओ विवेक गंभीर हे 20.09 कोटी रुपयांचे सर्वाधिक वेतन घेणारे FMCG एक्झिक्युटिव्ह होते. जून 2020 मध्ये गंभीर कंपनीतून पायउतार झाल्यानंतर,गोदरेज समूहाचे अध्यक्ष आदी गोदरेज यांची मुलगी निसाबा गोदरेज यांची एमडी आणि सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली. जीसीपीएलने मे महिन्यात सुधीर सीतापती यांची एमडी आणि सीईओ म्हणून नियुक्ती केली होती.

टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्स ह्या एफएमसीजी कंपनीने, त्यांचे एमडी आणि सीईओ सुनील डिसूझा यांना मानधन म्हणून 10.49 कोटी रुपये दिले. त्यांच्या अगोदर अजय मिश्रा यांना आर्थिक वर्ष 20 मध्ये मिळालेल्या 4.3 कोटी रुपयांच्या तुलनेत ही रक्कम जास्त आहे.

पॅकेजमध्ये वेतन, भत्ते, निवृत्त भत्त्यामध्ये योगदान, दीर्घकालीन इन्सेटीव्ह आणि स्टॉक पर्याय समाविष्ट आहेत.

पगारवाढ होत आहे.

या वर्षात मेहता हे एकमेव सीईओ होते ज्यांच्या पगारात पगारामध्ये घट झाली. बहुतेक इतर कंपन्यांनी त्यांच्या उच्च अधिकाऱ्यांना वेतनवाढ दिली. डाबरचे सीईओ मोहित मल्होत्रा ​​यांची वेतनवाढ 54.61 टक्क्यांनी होऊन 10.22 कोटी रुपये झाली.

आर्थिक वर्ष 20 मध्ये त्यांचे मानधन 6.61 कोटी रुपये होते. आयटीसीचे संजीव पुरी यांनीही आर्थिक वर्ष 21 मध्ये 47 टक्क्यांची लक्षणीय वाढ नोंदवली. मागील वर्षीच्या 7.83 कोटी रुपयांच्या तुलनेत त्यांचा एकूण पगार 11.95 कोटी रुपये होता.

वरुण बेरी, (एमडी आणि सीईओ, ब्रिटानिया) यांचे वेतन पॅकेज 7.46 टक्क्यांनी वाढून 10.52 कोटी रुपये झाले आहे, जे आर्थिक वर्ष 20 मध्ये 9.78 कोटी रुपयांच्या तुलनेत 7.46 टक्के जास्त होते. सौगत गुप्ताच्या मानधनात 2 टक्क्यांनी वाढ झाली, तर इमामीचे एमडी सुशील के. यांचे वेतन 1.4 कोटी राहिले.

Comments are closed.