इंडिगो एअरलाईनने प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, ‘ही’ सुविधा पुन्हा केली जाणार उपलब्ध
एअरलाइन कंपनी इंडिगो कंपनी 2 तासांपेक्षा कमी कालावधीच्या फ्लाइटसाठी ऑन-बोर्ड जेवण सेवा पुन्हा सुरू करेल. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने विमान कंपन्यांना सर्व देशांतर्गत उड्डाणांमध्ये जेवण देण्याची परवानगी दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
कोविडमुळे हवाई वाहतूक क्षेत्रावर सरकारने बरेच बंधन लादले होते. कोविडची लाट सध्या ओसरत असल्यामुळे बरेचसे निर्बंध आता दूर केले जात आहे.
एअरलाइन कंपनी इंडिगो कंपनी 2 तासांपेक्षा कमी कालावधीच्या फ्लाइटसाठी ऑन-बोर्ड जेवण सेवा पुन्हा सुरू करेल. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने विमान कंपन्यांना सर्व देशांतर्गत उड्डाणांमध्ये जेवण देण्याची परवानगी दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
15 एप्रिलपासून कोविडमुळे, हवाई वाहकांना दोन तासांपेक्षा कमी कालावधीसाठीचे जेवण उड्डाणात देण्याची परवानगी नव्हती.
“19 नोव्हेंबर, 2021 पासून आमचे सर्व ग्राहक ‘फूड अँड बेव्हरेज’ ऑन-बोर्ड खरेदी करू शकतील तसेच त्यांच्या खाद्यपदार्थाची प्री-बुकिंग करू शकतील,” असे इंडिगोचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वोल्फगँग प्रॉक-शॉअर म्हणाले.
ही सुविधा पुन्हा सुरू केल्याने केवळ लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसह प्रवास करणाऱ्या ग्राहकांनाच नाही तर रेड आय फ्लाइट पकडणाऱ्या ग्राहकांनाही मदत होइल.
सध्या इंडिगोकडे 275 हून अधिक विमानांचा ताफा आहे. एअरलाइन दररोज 1,400 हून अधिक उड्डाणे चालवत आहे आणि 71 देशांतर्गत आणि 24 आंतरराष्ट्रीय ठिकानांना जोडत आहे.
Comments are closed.