गणेश चतुर्थी च्या मुहूर्तावर येतोय जिओ फोन… पहा काय आहेत फिचर्स…
Reliance JioPhone Next will be launched in India on the eve of Ganesh Chaturthi that is September 10, 2021
मार्केटमध्ये तेजीत असणारी आणि टेलिकॉम क्षेत्रातील नामंकित कंपनी जिओ लवकरच जिओफोन नेक्स्ट हा स्मार्टफोन लाँच करणार आहे.
जिओफोन नेक्स्ट हा पूर्णपणे अद्ययावत आणि वैशिष्ट्यपूर्ण स्मार्टफोन आहे, जो गूगल आणि जिओ या दोन्ही ॲप्लिकेशन ला फॉलो करतो.
रिलायन्स १० सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर बहुप्रतिक्षित जिओफोन नेक्स्ट लॉन्च करणार आहे. कंपनीने २४ जून रोजी RIL च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत स्मार्टफोनचे अनावरण केले होते.
जिओफोन नेक्स्ट बद्दल
रिलायन्सने गुगलच्या मदतीनेने हा स्मार्टफोन विकसित केला आहे. जिओफोन नेक्स्ट स्मार्टफोन गुगल आणि जिओ ह्या दोन्ही ॲप्लिकेशनला समर्थन करेल.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन आणि सीईओ मुकेश अंबानी यांनी RIL AGM २०२१ मध्ये म्हटले होते की जिओफोन नेक्स्ट हा भारतातच नव्हे तर जगभरात उपलब्ध असलेला 4G स्मार्टफोन असेल.
जिओफोन नेक्स्ट हा अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टमच्या ऑप्टिमायझ्ड व्हर्जनद्वारे उपलब्ध असेल जो जिओ आणि गूगलद्वारे संयुक्तपणे विकसित केला गेला आहे.
फोनमध्ये व्हॉईस असिस्टंट, स्क्रीन टेक्स्टचा ऑटोमॅटिक रीड-अलाऊड, लँग्वेज ट्रान्सलेटर, ऑगमेंटेड रिॲलिटी फिल्टरसह स्मार्ट कॅमेरा यासारख्या फीचर्सचा समावेश आहे.
AGM दरम्यान RIL शेअरहोल्डर्स ना संबोधित करताना, गूगलचे सीईओ सुंदर पिचाई म्हणाले होते की, फोन ट्रान्सलेशन फिचर्स, कॅमेरा आणि नवीन अँड्रॉइड अपडेटसाठी सेवा प्रदान करेल.
जिओफोन नेक्स्ट वापरकर्त्यांना त्यांच्या भाषेतील कंटेंट एका टॅपने वाचण्याची अनुमती देईल. “रीड अलाउड” आणि “ट्रान्सलेट नाऊ” हे फिचर्स ओएसमध्ये उपलब्ध केले गेले आहे जे वेबपेज, ॲप्स, मेसेज आणि फोटो वर देखील काम करतील.
क्रिकेट स्कोअर किंवा हवामान अपडेट व्यतिरिक्त वापरकर्ते गूगल असिस्टंटला जिओ सावन वर संगीत प्ले करण्यास किंवा माय जिओ ॲपवर आपला बॅलन्स तपासण्यास सांगू शकतात.
जिओफोन नेक्स्ट कॅमेरा फिचर्समध्ये एचडीआर मोड सारखी वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत.
जिओफोन नेक्स्टच्या किंमतीचा तपशील अद्याप उघड झाला नसला तरी हा स्मार्टफोन जागतिक स्तरावर सर्वात परवडणारा 4G फोन असेल.
Comments are closed.