आणखी एक आयपीओ… हेल्थ सेक्टर मधील ही जायंट कंपनी आणतेय आयपीओ
Healthium Medtech has filed preliminary papers with capital markets regulator Sebi to raise funds via IPO.
सर्जिकल, पोस्ट- सर्जिकल आणि क्रॉनिक केअरमध्ये वापरल्या जाणाऱ्या उत्पादनांवर लक्ष केंद्रित करणारी हेल्थियम मेडटेक या जागतिक मेडटेक कंपनीने IPO द्वारे निधी उभारण्यासाठी सेबीकडे ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) दाखल केला आहे.
पब्लिक इश्यूमध्ये ३९० कोटी रुपयांचा फ्रेश इश्यू आणि शेअरहोल्डर विक्रीसाठी ३.९१ कोटी इक्विटी शेअर्सची ऑफर उपलब्ध आहे. प्रमोटर क्विनाग एक्विझिशन (एफडीआय) ३.९ कोटी इक्विटी शेअर्स ऑफलोड करेल आणि शेअरहोल्डर महादेवन नारायणमोनी ऑफर फॉर सेलद्वारे १ लाख इक्विटी शेअर्स विकतील.
फ्रेश इश्यूमधून उभारलेला निधी, कर्ज फेडण्यासाठी (५०.०९ कोटी) वापरण्याचा कंपनीचा प्रस्ताव आहे, तसेच सहाय्यक कंपन्यांमध्ये गुंतवणूक (सिरोनिक्स मेडिकल टेक्नॉलॉजी बीव्ही,क्लिनिसप्लाइस अँड क्वालिटी नीडल्स) एकूण १७९.४५ कोटी, इतर धोरणात्मक उपक्रम (५८ कोटी रुपये) करण्यासाठी वापरला जाईल.
सध्या ॲपॅक्स पार्टनर्सच्या सल्ल्याने क्विनाग ॲक्विझिशनची (एफडीआय) कंपनीमध्ये ९९.७९ टक्के शेअरहोल्डींग आहे.
क्विनाग ॲक्विझिशनने जून २०१८ मध्ये TPG ग्रोथ, AAJV इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट, मेनू सह शेअरहोल्डर ची विक्री करून हेल्थियम मेडटेक विकत घेतले होते.
फ्रॉस्ट अँड सुलिवनच्या अहवालात असे सूचित करण्यात आले आहे की, मार्च २०२१ पर्यंत जागतिक स्तरावर केलेल्या पाच शस्त्रक्रियांपैकी एकात हेल्थियम उत्पादनाचा वापर केला जातो. शिवाय आर्थिक वर्ष २१ पर्यंत ही सर्जिकल वस्तूंच्या बाजारपेठेतील सर्वात मोठी स्वतंत्र वैद्यकीय उपकरण कंपनी आणि एकूणच दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे.
कंपनी सर्वात मोठी नॉन-कॅप्टिव्ह सर्जिकल नीडल उत्पादक आहे. जागतिक पातळीवर एकूण विक्रीमध्ये २२.३० टक्के हिस्सा आणि नॉन-कॅप्टिव्ह मार्केटचा ४५.४१ टक्के वाटा कंपनीकडे आहे.
सेबी फाईलिंगमध्ये कंपनीने म्हटले आहे की या कालावधीत नफ्यात सुधारणा करताना त्यांनी आपल्या बाजारपेठांमध्ये आणि फोकस क्षेत्रांमध्ये २०१९ आणि २०२१ दरम्यान लक्ष दिले आहे.
ऑपरेशन्समधून त्याची कमाई FY19 आणि FY21 दरम्यान १०.५२ टक्के CAGR ने वाढली. एकूण अर्थव्यवस्थेवर कोविडच्या नकारात्मक परिणामांमुळे, FY20 आणि FY21 दरम्यान ऑपरेशन आणि EBITDA मध्ये ११.६१ टक्के आणि ६१.०६ टक्के वाढ झाली.
आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये कंपनीचा नफा लक्षणीय वाढून ८५.४३ कोटी रुपये झाला, जो FY20 मध्ये ३६.७६ कोटी आणि FY19 मध्ये १३.७३ कोटी रुपये होता.
कंपनीच्या उत्पादनाची मागणी रुग्णांच्या उपचार आणि शस्त्रक्रियेच्या प्रक्रियेवर आधारित आहे. फोकस क्षेत्रातील उत्पादनांची मागणी २०२१ आणि २०२५ दरम्यान ४.९९ टक्के CAGR ने वाढण्याची अपेक्षा आहे आणि २०२५ मध्ये २८.७५ अब्ज डॉलर असण्याचा अंदाज आहे. या वाढीसाठी मुख्य कारक म्हणजे वृद्ध लोकसंख्या आणि रोगांचे वाढते प्रमाण होय.
विशेषतः,भारतातील सर्जिकल वस्तू आणि आर्थोस्कोपी उत्पादनांची बाजारपेठ २०२१ मध्ये ४५५.८४ मिलियन डॉलर्स असल्याचा अंदाज आहे आणि २०२१ आणि २०२५ दरम्यान ती ९.६० टक्के CAGR ने वाढण्याचा अंदाज आहे, भारतातील शस्त्रक्रिया प्रक्रियांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
आयसीआयसीआय सिक्युरिटीज, सीएलएसए इंडिया, क्रेडिट सुईस सिक्युरिटीज (इंडिया) आणि नोमुरा फायनान्शियल ॲडव्हायझरी अँड सिक्युरिटीज (इंडिया) यांना या इश्यूचे मुख्य व्यवस्थापक म्हणून नियुक्त केले गेले आहे.
Comments are closed.