ॲमी ऑरगॅनिक्स IPO – या आठवड्यात होणार अलॉटमेंट, ‘फायदे की बात’ पहा.. 

Likely allotment will be done on 8th September 2021

सध्या शेअर मार्केट तेजीत आहे आणि बरेच IPO सुद्धा लॉन्च झाले आहेत. वाढत्या मार्केटमध्ये हे नविन IPO मोठी भरारी घेताना दिसत आहेत. स्पेशॅलिटी केमिकल फर्म ॲमी ऑरगॅनिक्सच्या IPO ने देखील उत्साहवर्धक भरारी घेतली आहे. या IPO ची अलॉटमेन्ट ८ सप्टेंबरला होण्याची शक्यता आहे.

हा IPO १ ते ३ सप्टेंबरपर्यंत सबस्क्रिप्शनसाठी खुला होता. गुंतवणूकदारांकडून या IPO ला जोरदार प्रतिसाद मिळाला. ह्या IPO ला ६४.५४ पट सब्स्क्रिप्शन मिळाले होते. QIB म्हणजेच क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्ससाठी राखीव असलेल्या कोट्यालादेखील ८६.६४ पट सब्स्क्रिप्शन मिळाले होते. रिटेल इन्व्हेस्टर्स म्हणजेच किरकोळ गुंतवणूकदारांनीही १३.३६ पट सब्स्क्रिप्शन करत ह्या इश्यूला चांगला पाठिंबा दिला.

पब्लिक इश्यूमध्ये २०० कोटी रुपयांचा फ्रेश इश्यू (आयपीओ प्लेसमेंटद्वारे निधी उभारल्यानंतर ३०० कोटी रुपयांवरून कमी करण्यात आला) आणि २० शेअरहोल्डरकडून ३७० कोटी रुपयांची विक्रीची ऑफर समाविष्ट आहे. फ्रेश इश्यूची रक्कम कंपनी कर्ज फेडण्यासाठी आणि वर्किंग कॅपिटलसाठी वापरणार आहे.

गुंतवणूकदारांना त्यांच्या शेअर अलोटमेंट तपासण्यासाठी दोन पर्याय आहेत.

IPO रजिस्ट्रार वेबसाइटवर गुंतवणूकदाराने हे  करावे.

अ) पॅन, अर्ज क्रमांक किंवा DP क्लायंट ID निवडा

ब) कंपनीचे नाव  Ami Organics Limited—IPO वर क्लिक करा.

क) त्यानुसार, पॅन, अर्ज क्रमांक किंवा DP क्लायंट आयडी टाका.

तसेच,बीएसई वेबसाइटवर शेअर अलॉटमेंट पाहू शकता. 
अ) इक्विटी आणि इश्यूचे नाव निवडा

ब) ऍप्लिकेशन नंबर टाका.

क) पॅन नंबर टाका.

ज्यांना अलॉटमेंट होणार नाही त्यांचे पैसे ९ सप्टेंबरला खात्यात परत मिळतील. ज्यांना अलॉटमेंट झाली त्यांना १३ सप्टेंबर रोजी डीमॅट खात्यांमध्ये शेअर्स जमा केले जातील. कंपनीचे लिस्टिंग १४ सप्टेंबरला होईल. आयपीओ वॉच आणि आयपीओ सेंट्रलच्या आकडेवारीनुसार, ग्रे मार्केटमध्ये ॲमी ऑरगॅनिक्सचा प्रिमियम मागील आठवड्यात १०५-११० रुपयांवरून १३०-१३५ रुपये झाला आहे. या प्रीमियमचा परिणाम म्हणजे ट्रेडिंग प्राइज ७४०-७४५ रुपये प्रति शेअर झाली.

 

Comments are closed.