‘ही’ लाईफ सायन्स कंपनी आणतेय IPO, अस असेल एकूण स्ट्रक्चर

टार्सन्स प्रॉडक्टने 10 नोव्हेंबर रोजी सांगितले की, ते 1,024 कोटी रुपयांच्या IPO साठी 635-662 रुपये प्रति शेअरचा प्राइस बँड निश्चित करत आहे. तीन दिवसीय IPO 15 नोव्हेंबर रोजी उघडेल आणि 17 नोव्हेंबर रोजी बंद होईल.

सध्या अनेक कंपन्या IPO आणत आहेत. IPO एक प्रकारचे वारेच मार्केटमध्ये वाहत आहे.आता लाईफ सायन्स कंपनी टार्सन्स प्रॉडक्ट देखील आपला IPO आणत आहे.

टार्सन्स प्रॉडक्टने 10 नोव्हेंबर रोजी सांगितले की, ते 1,024 कोटी रुपयांच्या IPO साठी 635-662 रुपये प्रति शेअरचा प्राइस बँड निश्चित करत आहे. तीन दिवसीय IPO 15 नोव्हेंबर रोजी उघडेल आणि 17 नोव्हेंबर रोजी बंद होईल.

अँकर गुंतवणूकदारांसाठी बोली 12 नोव्हेंबर रोजी उघडली जाईल, असे कंपनीने जाहीर केले.

सुरुवातीच्या शेअर विक्रीमध्ये 150 कोटी किमतीच्या इक्विटी शेअर्सचे फ्रेश इश्यू तसेच प्रमोटी आणि गुंतवणूकदारांद्वारे 1.32 कोटी इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल (OFS) यांचा समावेश आहे. संजीव सेहगल 3.9 लाख इक्विटी शेअर्स ऑफलोड करतील आणि रोहन सेहगल 3.1 लाख इक्विटी शेअर्स विकतील. गुंतवणूकदार Clear Vision Investment Holdings Pte Ltd 1.25 कोटी इक्विटी शेअर्स विकतील.

प्राइस बँडच्याद्वारे IPO ला 1,024 कोटी मिळण्याची अपेक्षा आहे. IPO मध्ये कर्मचाऱ्यांसाठी 60,000 इक्विटी शेअर्सचे आरक्षण उपलब्ध असेल.

ICICI सिक्युरिटीज, एडलवाईस फायनान्शिअल सर्व्हिसेस आणि SBI कॅपिटल मार्केट्स या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत. इक्विटी शेअर्स BSE आणि NSE वर लिस्ट केले जातील.

फ्रेश इश्यूमधून मिळालेले पैसे कर्ज भरण्यासाठी, पश्चिम बंगालमधील पंचला येथे नवीन उत्पादन सुविधा आणि जनरल कार्पोरेट उद्देशांसाठी वापरले जातील.

इश्यूचा अर्धा व्हॉल्यूम पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे, 15 टक्के गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी, तर 35 टक्के रिटेल गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. गुंतवणूकदार किमान 22 शेअर्ससाठी बोली लावू शकतात.

Comments are closed.