एल अँड टी इन्फोटेक देणार फ्रेशर्सला संधी
Company is recruiting more freshers than they did last year
सध्या आयटी क्षेत्रातील सगळ्याच कंपन्या मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध करून देत आहेत. आता या कंपन्यांच्या यादीत लार्सन अँड टुब्रो इन्फोटेकचा समावेश झाला आहे. जागतिक स्तरावर टेक कन्सल्टिंग आणि डिजिटल सोल्युशन्स पुरवणारी कंपनी लार्सन अँड टुब्रो इन्फोटेक (एलटीआय), या वर्षी ४,५०० फ्रेशर्सची नियुक्ती करणार आहे. गेल्या वर्षी कंपनीने ३००० फ्रेशर्सला नोकरी दिली होती.
मात्र आता कंपनीला वेगळ्याच समस्येला सामोरे जावे लागत आहे. गेल्या वर्षभरात एलटीआयच्या अनेक कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडून दुसऱ्या कंपनीत जाणे पसंत केले. हा हाय ऍट्रिशन रेटकंपनीची डोकेदुखी ठरत आहे. त्यावर उपाय म्हणून कंपनी यावर्षी जास्त फ्रेशर्सची भरती करणार आहे.
जून २०२१ अखेरीस कंपनी सध्या ३८३०० जणांना नोकरी देते. त्यापैकी ७८ टक्के कर्मचारी ऑफशोर सेंटर्सवर तैनात आहेत. या ऑफशोअर सेंटर्सच्या ठिकाणी कंपनी स्थानिक उमेदवारांना संधी देणार आहे.
एलटीआयचे सीईओ आणि एमडी संजय जालोना यांनी सांगितले की,”आम्ही या वर्षी ४५०० फ्रेशर्स नोकरीत घेण्याची योजना आखली आहे. या कर्मचाऱ्यांच्या करिअर अपस्किलिंगबाबत आम्ही उत्साहित आहोत.”
Comments are closed.