धुमश्चक्री! मॅरिको आणि डाबर मध्ये होणार तुंबळ धुमश्चक्री, ‘हे’ आहे कारण
Marico launches Chyawanprash to take on Dabur
FMCG कंपनी मॅरिकोने आपल्या आयुर्वेदिक ब्रॅण्ड सफोला इम्यूनिवेदा अंतर्गत नवीन च्यवनप्राश रेंज लॉन्च केली आहे. कंपनीचे ह्या सेगमेंट मधील दुसरे उत्पादन आहे.
संजय मिश्रा, सीओओ, मॅरिको यांनी एका प्रेस नोटमध्ये प्रोडक्ट लाँचची घोषणा केली. “आम्ही आमच्या इम्यूनिवेद बॅनर अंतर्गत नवीन सफोला च्यवनप्राश लॉन्च केले आहे. ह्या उत्पादनाद्वारे आम्ही आयुर्वेदातील फायदे आणि ग्राहकांसाठी इमुनिटी बूस्टर उत्पादने उपलब्ध करु.
कंपनी तीन SKU मध्ये उत्पादने उपलब्ध करते. 500 ग्रॅम 199 रुपयांना, 1 किलो 350 रुपयांना आणि 1.25 किलो व्हॅल्यू पॅक उपलब्ध आहेत. ही उत्पादने देशभरातील ई-कॉमर्स, आधुनिक व्यापार, जनरल प्लॅटफॉर्मवर आणि सफोला स्टोअर पोर्टलवर उपलब्ध असतील.
मॅरिको विरुद्ध डाबर
सफोला आणि पॅराशूट सारख्या ब्रॅण्ड्सच्या निर्मात्यानी गेल्या वर्षी सफोला आरोग्यम च्यवन अमृत अवलहाच्या कॅटेगरीमध्ये प्रवेश केला होता. तसेच बाजारात आधीच उपलब्ध असलेल्या च्यवनप्राश उत्पादनांना ‘सामान्य’ म्हटले होते. यानंतर मॅरिकोच्या विरोधात डाबरने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती आणि त्यांच्या जाहिरात मोहिमेला आव्हान दिले होते. डाबरने न्यायालयात केलेल्या तक्रारीत असेही आरोप केले होते की मॅरिकोचे उत्पादन पॅकेजिंग त्यांच्या सारखेच आहे.
आयुष मंत्रालयाच्या निर्देशानुसार सुमारे 48 घटक असलेल्या, च्यवनप्राशला ‘सामान्य’ म्हणता येणार नाही, या आधारावर डाबरने मॅरिकोविरुद्ध खटला लढवला होता.
दिल्ली उच्च न्यायालयाने डाबरच्या बाजूने निर्णय दिला होता, ज्यामुळे शेवटी मॅरिकोला जाहिरात मागे घ्यावी लागली.
मॅरिको आपली अनेक नवीन उत्पादने लाँच करून आपल्या फूड पोर्टफोलिओला बळकट करण्याचा प्रयत्न करीत आहे. च्यवनप्राश, हनी आणि इतर बर्याच नवीन कॅटेगरीमध्ये त्यांनी प्रवेश केला आहे. डाबरचे च्यवनप्राश मध्ये 60 टक्के आणि हनी मध्ये 40 टक्के शेअर्स आहेत.
आतापर्यंतची एकूण कामगिरी
मॅरिकोने हनी कॅटेगरीमध्ये मार्केट शेअर्स मिळवल्याचा दावा केला आहे, माञ च्यवनप्राशबाबत ते इतक्या प्रमाणात यशस्वी झाले नाही.
कंपनीने नुकतेच लाँच केलेले प्रॉडक्ट, च्यवनप्राश कॅटेगरी सुधारण्यासाठी उपलब्ध केले जाईल.
एडलवाईस सिक्युरिटीजचे कार्यकारी संचालक अबनीश रॉय म्हणाले, “च्यवनप्राश कॅटेगरी सुधारण्यासाठी कंपनीला खूप प्रयत्न करावे लागणार आहेत.” मॅरिकोला हनी कॅटेगरीमध्ये अधिक चांगल्या संधी आहेत, आणि त्याचा विस्तार होत राहील.
कंपनी वर्षाच्या अखेरीस हनी उत्पादनातून 100 कोटी रुपयांच्या उत्पन्नाचे लक्ष्य ठेवत आहे. इन्स्टंट नूडल्स सफोला ओडल्स आणि सफोला मीलमेकर सोया चंक्स यासारख्या नवीन उत्पादनांसह त्यांना एकूण व्यवसायातून, 500 कोटी रुपये महसूल मिळत आहे.
Comments are closed.