भारतात एकूण ATM ची संख्या किती? वाचा अर्थमंत्रालयाने दिलेली माहिती
संसदेत सध्या अर्थकारणावर बरीच चर्चा झडत आहे. प्रश्नउत्तरांची गहन चर्चा सध्या संसदेत घडते आहे. असाच एक प्रश्न ATM संबंधित विचारण्यात आला होता, चला तर घेऊया ATM संबंधित चर्चेचा धावता आढावा.
संसदेत सध्या अर्थकारणावर बरीच चर्चा झडत आहे. प्रश्नउत्तरांची गहन चर्चा सध्या संसदेत घडते आहे. असाच एक प्रश्न ATM संबंधित विचारण्यात आला होता, चला तर घेऊया ATM संबंधित चर्चेचा धावता आढावा.
संसदेत ATM संबंधीत माहितीवर बोलताना अर्थमंत्रालयाने सांगीतले की,या वर्षी सप्टेंबरअखेर देशभरातील ATMची संख्या 2.13 लाखांवर पोहचली आणि त्यापैकी 47 टक्क्यांहून अधिक ग्रामीण आणि निमशहरी भागात आहेत.
RBI च्या आकडेवारीनुसार, शेड्युल कमर्शिअल बँकांनी सप्टेंबर 2021 पर्यंत 2,13,145 ATM सुरु केले आहेत. या व्यतिरिक्त, सप्टेंबर 2021 पर्यंत WLA ऑपरेटरद्वारे 27,837 व्हाईट लेबल ATM देखील सुरु केले आहेत.
47.4 टक्के ATM ग्रामीण आणि निमशहरी केंद्रांमध्ये स्थापित आहेत.
2022 पर्यंत किती ATM सुरु करण्याच्या उद्दिष्टावर विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, RBI ने सूचित केले आहे की WLA ऑपरेटरना दरवर्षी किमान 1,000 ATM तयार करणे आवश्यक आहे. शहरी, निमशहरी आणि ग्रामीण भागांसाठी 1:2:3 चे प्रमाण राखणे आवश्यक आहे.
Comments are closed.