चहासोबत पारले बिस्कीट खायचय तर आता मोजावे लागतील जास्तीचे पैसे
देशातील बिस्किटे, स्नॅक्स आणि कन्फेक्शनरीजच्या प्रमुख उत्पादकांपैकी एक असलेल्या पारले प्रॉडक्ट्सने दिलेल्या माहितीनूसार कंपनी चालू आर्थिक वर्षाच्या (FY22) तिसऱ्या आणि चौथ्या तिमाहीत त्यांच्या प्रॉडक्टच्या किमती 10 ते 20 टक्क्यांच्या आसपास वाढवण्याच्या तयारीत आहे
देशातील बिस्किटे, स्नॅक्स आणि कन्फेक्शनरीजच्या प्रमुख उत्पादकांपैकी एक असलेल्या पारले प्रॉडक्ट्सने दिलेल्या माहितीनूसार कंपनी चालू आर्थिक वर्षाच्या (FY22) तिसऱ्या आणि चौथ्या तिमाहीत त्यांच्या प्रॉडक्टच्या किमती 10 ते 20 टक्क्यांच्या आसपास वाढवण्याच्या तयारीत आहे.
जास्तीच्या इनपुट कॉस्ट प्रेशरमुळे पारले बिस्किट कंपनीने मागील तिमाहीत 10 ते 15 टक्क्यांच्या दरम्यान किंमत वाढवली होती.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कंपनी तेल, गव्हाचे पीठ, आणि साखर यांच्या किमतीत झालेल्या दरवाढीमुळे दर वाढवत आहे.
किंमत वाढीच्या सेकंड राऊंडमध्ये बिस्किटे, मिठाई आणि स्नॅक्स यांच्या किमती वाढवल्या जातील.
पारले रस्कच्या 300 ग्रॅम पॅकसाठी 10 रुपयांची वाढ आणि 400 ग्रॅम पॅकसाठी 4 रुपयांची वाढ होणार आहे. ParleG, Krackjack इत्यादी पारले बिस्किटांच्या किमती जवळपास 5 ते 10 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे.
कमी किमतीच्या युनिट्ससाठी म्हणजेच, जिथे किमती 10 ते30 रू.च्या श्रेणीत आहेत, त्याबाबत कंपनीने पॅकेट्सचे वजन कमी केले आहे. उदाहरणार्थ, 10 रुपये किमतीच्या 50 ग्रॅम पॅकची किंमत 10 रुपये राहील पण वजन कमी होईल.
पारलेने नुकतेच त्यांच्या लोकप्रिय ब्रँड “हाइड अँड सीक” द्वारे ब्रेकफास्ट सीरियल मार्केटमध्ये प्रवेश केल्याची घोषणा केली होती.
Comments are closed.