कोवीडनंतर ‘ही’ कंपनी करतेय व्यवसायिक बदल – वाचा सविस्तर

नावाजलेला रेमंड ग्रूप आपला व्यवसाय पाच रेव्हेन्यू ग्रुपमध्ये आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहे. भविष्यात कॅपिटल ग्रोथसाठी कंपनी व्यावसायिक बोर्ड स्थापन करण्याच्या दिशेने काम करीत आहे.

नावाजलेला रेमंड ग्रूप आपला व्यवसाय पाच रेव्हेन्यू ग्रुपमध्ये आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहे. भविष्यात कॅपिटल ग्रोथसाठी कंपनी व्यावसायिक बोर्ड स्थापन करण्याच्या दिशेने काम करीत आहे.

यानुसार रेमंड ग्रूपमध्ये आता वस्त्रोद्योग, ग्राहकोपयोगी वस्तू, रिअल इस्टेट, शिक्षण आणि इंजिनीअरिंग हे पाच व्यवसाय क्षेत्रे असतील.

ग्रुपचे अध्यक्ष गौतम हरी सिंघानिया यांनी सांगितले, “आमचे सगळे बोर्ड पुढील 12 महिन्यांत पूर्णपणे व्यावसायिक होतील. आमच्या FMCG आणि उत्पादन कंपन्यांनी हे आधीच केले आहे.

सिंघानिया म्हणाले, “ कोविड आणि त्यानंतरच्या लॉकडाऊनमुळे आम्हाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. यामुळे आम्ही आमच्या रणनीतीवर पुनर्विचार करत आहोत.

ते म्हणाले, “कंपनीच्या वाढीसाठी आम्ही नविन व्यावसायिक बोर्ड आणण्याचा विचार करत आहोत जेणेकरुन कंपनीच्या वाढीला गती मिळण्यास मदत होईल.” रिअल इस्टेट क्षेत्रासाठी त्यांनी नविन योजना विकसित करणार असल्याचं जाहीर केलं.

कोविड मध्ये ग्रुपने आपला पहिला प्रोजेक्ट ठाणे लँड पार्सलवर बांधून रिअल इस्टेट व्यवसाय सुरू केला होता.

सिंघानिया म्हणाले,”आम्ही एकमेव रिअल इस्टेट क्षेत्रांतील एकमेव कंपनी आहोत, ज्यानी अपार्टमेंट्स डिलिव्हरीची तारीख जाहीर केली आहे आणि मी ते जाहीरपणे सांगत आहे. पुढील वर्षी 10 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता आम्ही अपार्टमेंट खरेदीदारांना देऊ.

सध्या, रेमंड रिअल्टी ठाण्यातील कॅडबरी जंक्शन येथे 9.5 एकरमध्ये ग्रेड A कार्यालये आणि हाय-स्ट्रीट व्यावसायिक प्रोजेक्ट विकसित करत आहे.

आतापर्यंत, रेमंड रियल्टीने 10X प्रोजेक्टमध्ये सुमारे 2,350 युनिट्सच्या एकूण लॉन्च केलेल्या इन्व्हेंटरीपैकी 70% पेक्षा जास्त विक्री केली आहे.

Comments are closed.