पेटीएममध्ये इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सचा रस वाढला
पेटीएमने निराशाजनक पदार्पण केल्यानंतर आता काही प्रमाणात दिलासा देणारी वाटचाल सुरु केली आहे. सलग तिसऱ्या दिवशी कंपनीचा गेन वाढत गेला आहे.
पेटीएमने निराशाजनक पदार्पण केल्यानंतर आता काही प्रमाणात दिलासा देणारी वाटचाल सुरु केली आहे. सलग तिसऱ्या दिवशी कंपनीचा गेन वाढत गेला आहे.
विश्लेषकांनुसार खराब सुरुवातीनंतर गुंतवणूकदार त्यांच्या खरेदी किंमतीची सरासरी काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. ब्लूमबर्गच्या अहवालात असे म्हटले आहे की, पेटीएमच्या ऑफरमधील अनेक अँकर गुंतवणूकदारांनी शेअर्स 1,272 पर्यंत कमी झाल्यानंतर कंपनीत स्टेक वाढवण्याचा प्रयत्न केला.
सूत्रांनुसार, ब्लॅकरॉक आणि कॅनडा पेन्शन प्लॅन इन्व्हेस्टमेंट बोर्डाने मंगळवारी आणि बुधवारी जास्तीचे पेटीएम शेअर्स खरेदी केले.
दुपारी 3:30 वाजता, NSE वर शेअर 2.64 टक्क्यांनी वाढून 1,798.75 वर बंद झाला. शेअर आज 1,873 च्या इंट्राडे हाईवर पोहोचला होता.
मूल्यांकन, बिझनेस मॉडेलबद्दल अनिश्चितता आणि नफ्याबाबत साशंकता यामुळे शेअर 2,150 च्या इश्यू किंमतीपासून सुमारे 20 टक्के दूर आहे. अनेकांच्या मते हा टप्पा गाठण्यासाठी शेअरला भरपुर कालावधी लागेल.
“ज्या मोठ्या गुंतवणूकदारांनी IPO मध्ये शेअर्स खरेदी केले आहेत, ते त्यांच्या शेअर्सची सरासरी किंमत कमी करण्याचा विचार करत आहेत.
Comments are closed.